Shirdi FDA Action: शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरुच! अन्न औषध प्रशासनाकडून पुन्हा धाडसत्र; दोन लाखांचा साठा नष्ट

अन्न औषध प्रशासनाचे शिर्डीत पुन्हा धाडसत्र पडले आहे. निकृष्ट दर्जाचा 500 किलोहून अधिक पेढा केला जप्त करण्यात आले असून सकाळपासूनच FDA ची शिर्डीत धडक कारवाई पाहायला मिळाली.

Shirdi FDA Action: शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरुच! अन्न औषध प्रशासनाकडून पुन्हा धाडसत्र; दोन लाखांचा साठा नष्ट

राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने सध्या भेसळखोर आणि भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अवैध गुटखा विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि औषध विक्रेत्यांवर कारवायांचा धडाका लावला आहे. अशातच अन्न औषध प्रशासनाचे शिर्डीत पुन्हा धाडसत्र पडले आहे. 

निकृष्ट दर्जाचा 500 किलोहून अधिक पेढा केला जप्त करण्यात आले असून सकाळपासूनच FDA ची शिर्डीत धडक कारवाई पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी जय महाराष्ट्र चॅनलने शिर्डीतील निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांचा पर्दाफाश केला होता. भाविकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ पाहता जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर FDA कडून दुसऱ्यांदा साई मंदिर परिसरातील खासगी पेढे विक्रेत्यांच्या दुकानातून शेकडो किलो पेढा जप्त करत मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा- Hotel New Rules: तुकाराम मुंढेंचा हॉटेल्सना दणका; आता ग्राहकांना मोफत पाणी देणे बंधनकारक; 'किचन'साठी जारी केली कडक नियमावली

यावेळी अन्न औषध प्रशासन अधिकारी अपर्णा भोईटे माहिती दिली की, भेसळयुक्त व बनावट पेढ्यांची साईमंदिर परिसरात विकले जात असल्याच्या तक्रारी त्यांना प्राप्त झाल्या. त्यानंतर अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकारान मुंढे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. यावेळी साई मंदिर परिसरातील पेढा प्रसादाच्या दुकानांतून आणि पेढे बनविणाऱ्या कंपनीत धाड टाकत पेढ्यांचे नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच भेसळीच्या संशयावरून जवळपास 600 किलोहून अधिक पेढे नष्ट करण्यात आले आहेत. जवळपास दोन लाख रुपये किंमतीचा पेढ्यांचा साठा नष्ट करण्यात आला असून चांगल्या दर्जाचे पेढे भाविकांना मिळतील यासाठी प्रशासन सतर्क राहील असं आश्वासन त्यांनी दिले आहे. 

दररोज हजारो तर वर्षाकाठी करोडो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. अनेक भाविक साई मंदिर परिसरात असणाऱ्या खासगी दुकानदारांकडून प्रसाद विकत घेतात. मात्रसाईबाबांच्या शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असून मंदिर परिसरातील शेकडो प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान पुन्हा एकदा निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांमुळे साईभक्तांमध्ये तीव्र नाराजी असून, श्रद्धेच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबणार तरी कधी?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number