मुंबई : शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार फुटल्यानंतर आज पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का देण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वरळीचे शिलेदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी आज विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज शिवसेनेकडून दाखल केला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी महायुतीचे सर्व मंत्री, आमदार तेथे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल करताना उपस्थिती दर्शवली. सचिन अहिर यांच्या या कृत्यांने राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ माजली. वरळी मतदारसंघाचे आमदारपद भूषवणारे सचिन अहिर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंसाठी हा मतदारसंघ सोडला होता. त्यानंतर त्यांना विधान परिषदेचे आमदारपद देण्यात आला. त्यांच्या या धक्कातंत्रानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामागची भूमिका मांडली.
एकनाथ शिंदे यांनी आमदार सचिन अहिरांचा सचिन तेंडुलकर म्हणून केला उल्लेख करत सुरूवात केली. यावेळी एकच हशा पिकला. त्यानंतर त्यांनी गमतीचा भाग म्हणून मूळ मुद्द्याला हात घातला. पुढे शिंदे म्हणाले की, सचिन अहिप यांनी पण आज षटकार मारला आहे. सहा मतदारसंघात काही लोकं जाऊन आले. त्यांचं सचिन अहिर यांनी षटकारामधून स्वागत केलेलं आहे. पुढेही ते षटकार मारून अनेक विकेट काढतील. सचिन अहिर तीन वेळ विधान परिषदेचे आमदार होते. आता ही आहेत. अनेक युनियनमध्ये त्यांनी प्रमुख पदावर काम केले आहे. कोळीवाड्यांचे मूळ भूमीपुत्र नेते अशी त्यांनी ओळख आहे. शिवसैनिकांना न्याय देणारा ग्रास रूटचा म्हणून ओळख पाहतो. त्यांनी आज विधान परिषद उपसभापती पदाचा फॉर्म भरला आहे. महायुतीचा फॉर्म भरला आहे. उद्या उपसभापती म्हणून त्यांची प्रस्तावाच्या माध्यमातून निवड होईल. मुंबई पुरतेनाही तर महाराष्ट्रामध्ये उपसभापती म्हणू न्याय देण्यासाठी ते काम करतील. सचिन अहिर शिवसेनेत आल्यामुळे सेनेची ताकद मुंबई-पुणे कामगार क्षेत्रात वाढणार आहे. शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि यामध्ये सोबत काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.