Sunday, February 08, 2026 02:24:30 AM

Shivsena UBT Dasara Melava: शिवसेना ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित राहणार?, समोर आली मोठी माहिती

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


shivsena ubt dasara melava शिवसेना ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित राहणार समोर आली मोठी माहिती

मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे.  दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे देखील भाषण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

विधानसभा निवडणुकीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला होता. शिवसेना ठाकरे गटासाठी मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची  रस्त्यावरील आंदोलने सुरु असली तरीही त्यांना निवडणुकीत मोठं यश मिळत नाही. त्यातच ठाकरे बंधू निवडणूक एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

हेही वाचा: TVK Vijay Rally Stampede: सुपरस्टार विजय थलापतींच्या सभेत चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा 39 वर, अनेक जखमी

ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन झाल्यानंतर आता राज ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात हजर राहणार असल्याची चर्चा होती. पण, या दसरा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण दिले जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. या दसरा मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात होते. याच दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची जाहीर घोषणा होईल असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र, राज ठाकरे हे दसरा मेळाव्यात नसल्याने युतीची घोषणा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याआधीच भूमिका मांडली होती. शिवसेना आणि मनसे दोन राजकीय पक्ष असून त्यांचे काही मेळावे महत्त्वाचे आहेत. शिवसेनेसाठी दसरा मेळावा महत्त्वाचा असतो. तर, मनसेसाठी गुढी पाडवा मेळावा महत्त्वाचे असल्याचे वक्तव्य संजय राऊतांनी केले होते. 

दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडून त्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. दसरा मेळावा नेहमीच शिवसेनेसाठी ताकद दाखवण्याचे व्यासपीठ राहिले आहे. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा दसरा मेळावा अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या