Sujat Ambedkar PC : "BJP च्या 100 उमेदवारांची बिनविरोध निवड", सुजत आंबेडकरांचा महायुतीबाबत मोठा गौप्यस्फोट

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी नागपूरमधील पत्रकार क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधला.

Sujat Ambedkar PC : &quotBJP च्या 100 उमेदवारांची बिनविरोध निवड&quot, सुजत आंबेडकरांचा महायुतीबाबत मोठा गौप्यस्फोट

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी नागपूरमधील पत्रकार क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले की, “नागपुरात बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो लोकांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला… जोपर्यंत आरएसएस आमच्या मागणीवर निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचा आरएसएस ला विरोध राहील… छत्रपती संभाजीनगर मध्ये आमच्या कार्यकर्त्यांवर आरएसएस ने गुन्हा दाखल केला… यासाठी आम्ही आंदोलन केले तेंव्हा तीन गोष्टी लिहून गेलो तेंव्हा त्यांनी स्वीकारल्या नाही… आरएसएसने भारताचे संविधान स्वीकारले नाही… भारताचा तिरंगा झेंडा आरएसएसला देण्यासाठी गेलो होतो त्यांनी तो स्वीकार ला नाही… आरएसएसने नोंदणी करण्यास नकार दिला… भारताची ओळख हिंदू धर्म आहे,हिंदू संपला तर भारत संपेल असं मोहन भागवत म्हणाले होते… हा राष्ट्रीयत्वाचा अपमान आहे… ” 

हेही वाचा- Municipal Elections Postponed: ‘सर्व बाजूंचा विचार केल्यावरचं…’; राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं निवडणुका पुढे ढकलण्यामागील कारण

पुढे बिहार निवडणूक आणि नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सुजात आंबेडकर म्हणाले की,”तिसरी आघाडीची शक्यता खूप आहे… एका बाजूला मविआ आहे,महायुती दिसेल याशिवाय अनेक छोटे पक्ष आणि संघटना आहेत… आंबेडकर गट तटाची लोकसभा आणि विधानसभा मधील एकूण मतांची टोटल ही वंचितच्या मतांपेक्षा कमी आहे,त्यामुळे तिसरी आघाडी वंचित आहे… 18 दिवस भाजप विरोधात सामान्य उमेदवार निवडणुकीत टिकणार नाही…  भाजप पूर्ण ताकदीने कामाला लागला आहे…  तडकाफडकी निवडणूक मागे पुढे करणे हा निवडणुकीला सामान्य माणूस उभा राहू शकणार नाही अशी यंत्रणा भाजपने तयार केली आहे…  जर न्यायालयात याचिका दाखल असेल तर ongoing निवडणूक वर स्थगिती देऊ शकते का हे तपासावे लागेल… पैशामुळे निवडणूक जिंकणे कठीण झाले आहे…  विरोधक संपवण्याच्या हा प्रकार आहे,त्यातून लोकशाही संपवण्याचा प्रकार आहे…  आपण आपली प्रतिमा काशी ठेवावी हे महत्वाचे आहे…  संसदीय कार्यपद्धती पाळली पाहिजे…  लोकप्रतिनिधी आहोत याचे भान ठेवावे… ” 

हेही वाचा- Elections 2025 : मुंबईत मतदार यादीत मोठा घोळ! तब्बल 7 हजार मतदारांचे वॉर्ड बदलले

पुढे काँग्रेससोबतच्या युतीवर सुजात आंबेडकर म्हणाले की, “काँग्रेसचा उमेदवार वंचितच्या उमेदवार पडण्याचे प्रयत्न करतात… काँग्रेस दगाबाजी करते हे लक्षात आले आहे…  नांदेडमध्ये आम्ही युती केली तर त्यांनी पाठीत खंजीर खुपसले…  काँग्रेसने 50 पन्नासची युती केली तर आम्ही तयार आहोत…” 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number