Girish Mahajan: ‘विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात…’, महाजनांच्या वक्तव्याने चर्चांणा उधाण

विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करू नका, असा सल्ला महाजन यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

Girish Mahajan: ‘विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात…’, महाजनांच्या वक्तव्याने चर्चांणा उधाण

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. अनेक नेते पदाधिकारी भाजपात प्रवेश करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पक्षप्रवेशावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे. विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करू नका, असा सल्ला महाजन यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. जळगावच्या जामनेरमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

काय म्हणाले गिरीश महाजन?
मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावच्या जामनेरमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विरोधकांची तोंड बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्षप्रवेश विरोध करु नका असा सल्ला महाजन यांनी कार्यकर्त्यांना दिला. गिरीश महाजन भाजपाचे बडे नेते समजले जातात. भाजपाचे संकटमोचक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांच्या माध्यमातून अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. अशातच त्यांनी विरोधकांना आपलसं करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आगामी काळात नेमका कोणाचा पक्षप्रवेश भाजपात होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

हेही वाचा: Kolhapur News : 'मंदिराच्या मूळ रचनेचे नुकसान होता कामा नये', मंत्री माधुरी मिसाळ यांचे आदेश

'महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार'  
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्येच लढणार आहे. त्यामुळे एकही जागा काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना मिळता कामा नये असे महाजन यांनी म्हटले आहे. विरोधकांची तोडं बंद करायची आहेत. त्यामुळं त्यांना आपल्याकडे घ्यायचं आहे. दुसऱ्या पक्षातला नेता, कार्यकर्ता कसाही असूद्या पण कामाचा माणूस आहे असे महाजन म्हणाले. 
पुढे बोलताना, कितीतरी लोक आपल्यावर टीका करणारे होते परंतु आज ते आपल्याकडे आले. जो या पक्षामध्ये काम करेल त्याला पक्षात किंमत आहे. फक्त फोटोबाजी करणाऱ्याला किंमत नाही. कार्यकर्ता छोटा जरी असला तरी त्याला पक्षात घ्या असा सल्ला महाजन यांनी दिला. आता त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. येणाऱ्या काळात नेमके कोणत्या पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे भाजपात येतात ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number