Sindhudurg Zilla Parishad Election 2026 : चार वर्षांनंतर जिल्ह्याच्या राजकारणाला मिळणारा नवा श्वास; सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राजकीय इतिहास जाणून घ्या

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, या निमित्ताने कोकणातील या ऐतिहासिक जिल्ह्याकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

Sindhudurg Zilla Parishad Election 2026 :  चार वर्षांनंतर जिल्ह्याच्या राजकारणाला मिळणारा नवा श्वास; सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राजकीय इतिहास जाणून घ्या

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इतिहास
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, या निमित्ताने कोकणातील या ऐतिहासिक जिल्ह्याकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती १ मे १९८१ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातून विभक्त होऊन झाली. २०१७ नंतर तब्बल ९ वर्षांनी ही निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या ५० आणि आठ पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठी आज 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपल्यानंतर ओबीसी आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन पेचप्रसंगामुळे जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परिणामी गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकांमार्फत चालवला जात होता. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाही प्रक्रियेला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यात १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत असताना केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणावर सदस्य बिनविरोध निवडून आले होते. आता जिल्हा परिषदेच्या ४२ जागांसाठी आज मतदान पार पढणार आहे. आता होणाऱ्या निवडणुकांमुळे या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना नवे नेतृत्व मिळणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती
कोकण पट्ट्यातील हा जिल्हा पश्चिमेस अरबी समुद्र व पूर्वेस सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेला असून, येथील हवामान उष्ण व दमट आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ८,४९,६५१ असून, ओरोस (सिंधुदुर्गनगरी) हे मुख्य ठिकाण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्थान कोकण किनारपट्टी, पूर्वेस सह्याद्री आणि पश्चिमेस अरबी समुद्र येथे आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ५,२०७ चौ. किमी असून येथील हवामान, किनारपट्टीचा भाग असल्याने हवामान उष्ण आणि दमट असते. या जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, देवगड, कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग अशी ८ तालुके आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसंख्या
२०११ नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसंख्या ही सुमारे ८,४९,६५१ इतकी असून त्यात ४,१७,३३२ पुरुष आणि ४,३२,३१९ महिला यांचा समावेश होता. त्यानंतर सध्या प्रशासकीय राजवट संपणार असून ५ लाख ९९ हजार ५६७ मतदार हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ५,९९,५६७ मतदार असून, त्यांच्यासाठी ८७० मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. 

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय रणनिती?
एकूण जागाः ५०
पंचायत समिती: ८
बिनविरोध जागाः ०८ (भाजप ७, शिंदेसेना १)
मतदान होणाऱ्या जागाः ४२
बहुमतासाठी आवश्यक आकडाः २६
महायुतीला विजयासाठी हवेतः १८ (८ आधीच विजयी)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number