Madha Anjangaon Controversy: माढा ‘अंजनगाव’मधील पुतळ्यासंदर्भातील वाद मिटला! लक्ष्मण हाकेंनी घेतले आंदोलन मागे; पाहा काय निघाला तोडगा?

सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे.

Madha Anjangaon Controversy: माढा ‘अंजनगाव’मधील पुतळ्यासंदर्भातील वाद मिटला! लक्ष्मण हाकेंनी घेतले आंदोलन मागे; पाहा काय निघाला तोडगा?

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेळोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद अखेर मिटल्याची माहिती समोर आली आहे. या पुतळ्याच्या ठिकाणावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

या प्रकरणात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र, त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले आणि त्यामुळे हा वाद शांत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

वादाचे कारण काय?

धनगर समाजाच्या मंदिराशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुद्दाम ठेवण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. यामुळे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. लक्ष्मण हाके यांनी पुतळा त्या ठिकाणाहून हलवून सन्मानपूर्वक दुसऱ्या योग्य जागी स्थापित करावा, अशी मागणी केली होती.

हेही वाचा: Nitesh Rane: ‘मुंब्य्राचं नाव बदलून मुंब्रादेवी करणार’; जाहीर सभेत नितेश राणेंचा थेट इशारा

मध्यस्थीतून तोडगा

या वादावर तोडगा काढण्यासाठी माजी आमदार राजन पाटील यांनी मध्यस्थी केली. दोन्ही गटांची मते ऐकून घेतल्यानंतर त्यांनी हा वाद शांततामय मार्गाने सोडवला.

सरकारी जागेत नवा पुतळा

त्यानुसार, आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावातील सरकारी जागेत आणि सरकारी खर्चाने उभारला जाणार आहे. या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राजन पाटील यांच्या उपस्थितीत जागेची पाहणी करण्यात येणार आहे.

कडक पोलीस बंदोबस्त

हा मुद्दा संवेदनशील असल्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून माध्यमांवरही काही मर्यादा घालण्यात आल्या होत्या.

दरम्यान, आता दोन्ही गटांमध्ये समझोता झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली असून गावात शांतता प्रस्थापित झाल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी दिली आहे. 

हेही वाचा: Sunetra Pawar : जयची प्रमुखपदी नियुक्ती, तटकरे-पटेल यांची दिल्लीत भेट, तर दौऱ्यानंतर पहिला फोन उद्धव ठाकरेंना; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राजकीय हालचालींना वेग

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number