Balasaheb Sarvade Death : सोलापूर हादरलं; भाजपच्या दोन गटांतील वादात मध्यस्थी करायला गेलेल्या मनसे नेत्याला संपवलं

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या दोन गटांतील अंतर्गत संघर्षाने इतकं हिंसक वळण घेतलं की, यात मध्यस्थीसाठी गेलेल्या एका मनसे पदाधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागला.

Balasaheb Sarvade Death : सोलापूर हादरलं; भाजपच्या दोन गटांतील वादात मध्यस्थी करायला गेलेल्या मनसे नेत्याला संपवलं

Balasaheb Sarvade Death : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला शुक्रवारी गालबोट लागलं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या दोन गटांतील अंतर्गत संघर्षाने इतकं हिंसक वळण घेतलं की, यात मध्यस्थीसाठी गेलेल्या एका मनसे पदाधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर शहरात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

नेमकी घटना काय?

सोलापूर महापालिकेच्या प्रभाग 2 मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे यांच्या विरोधात पक्षाच्याच बंडखोर रेखा सरवदे यांनी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी दोन्ही गटांत गेल्या काही दिवसांपासून तणाव होता. शुक्रवारी या वादाचा स्फोट झाला. भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचे संपर्क कार्यालय दुसऱ्या गटाने फोडले. हा राडा सुरू असतानाच, मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हे वाद मिटवण्यासाठी तिथे गेले होते. मात्र, त्याच वेळी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – Bhiwandi Municipal Election 2026: भिवंडीत फुललं कमळ; मुस्लिम उमेदवारासह 5 जण बिनविरोध विजयी

आमदारांच्या पुत्रासाठी दबाव तंत्राचा आरोप

या कृत्यानंतर मनसेचे लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत इंगळे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. प्रभाग 2 मधून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आणण्यासाठी सरवदे कुटुंबावर भाजप नेत्यांकडून मोठा दबाव टाकला जात होता, असा दावा मनसेने केला आहे. याच दबावातून आणि वादातून बाळासाहेब सरवदे यांना संपवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – PMC Election 2026 : ‘हॅलो उद्धव…’; शिंदेंच्या एका फोननंतर ‘त्या’ उमेदवाराची माघार, शिंदेंच्या नेत्यानं केलेला भयानक प्रकार

पोलिसांची कारवाई आणि शहरात तणाव

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जेलरोड पोलिसांनी या प्रकरणी तातडीने हालचाली करत चार संशयितांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे. तथापी, सोलापूर महानगरपालिका परिसर आणि प्रभाग 2 मध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजकीय वर्चस्व आणि बिनविरोध निवडीच्या हट्टापायी एका तरुण नेत्याचा बळी गेल्याने सोलापूरकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number