Sushma Andhare: ‘रेटून खोटं बोलू नका…’; भर पत्रकार परिषदेत जुने ट्विट्स अन् फोटो दाखवत सुषमा अंधारेंचा भाजपवर निशाणा

भर पत्रकार परिषदेत अंधारे यांनी मोदी शहा यांचे जुने फोटो दाखवले आणि महिला आरक्षण विधेयक 2023 मध्येचं पारित झाल्याचा दावा केला. <br/>

Sushma Andhare: ‘रेटून खोटं बोलू नका…’; भर पत्रकार परिषदेत जुने ट्विट्स अन् फोटो दाखवत सुषमा अंधारेंचा भाजपवर निशाणा

Sushma Andhare: महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र राजकारण कमालीचे तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या हक्कासाठी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, तुमची खुर्ची सोडण्याची तयारी आहे का?” असा जळजळीत सवाल करत अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडले. तसेच भर पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी शहा यांचे जुने फोटो दाखवले आणि महिला आरक्षण विधेयक 2023 मध्येचं पारित झाल्याचा दावा केला. 

“देवेंद्र फडणवीस रेटून खोटं बोलतायत”
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर ‘खोटेपणा’चा आरोप केला. 2023 मध्ये जेव्हा हे विधेयक संसदेत मांडले गेले, तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ‘विधेयक मंजूर झाले’ अशा आशयाची ट्विट्स केली होती. अंधारे यांनी ही जुनी ट्विट्स आणि भाषणे ऐकवत विचारले की, “जर विधेयक तेव्हाच मंजूर झाले होते, तर आता विरोधकांमुळे ते पडले असा दावा फडणवीस कोणत्या आधारावर करत आहेत? नेमकं खरं कोण बोलतंय हे जनतेला कळू द्या.”

इतिहासाचा दाखला आणि राजीनाम्याचे आव्हान
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना अंधारे यांनी 1951 सालच्या घटनांचा संदर्भ दिला. त्या म्हणाल्या, “महिलांच्या अधिकारांची पहिली ‘भ्रूणहत्या’ तेव्हा झाली जेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी बाबासाहेबांच्या बिलाला विरोध केला होता. त्यावेळी बाबासाहेबांनी तत्त्वासाठी पदाचा त्याग केला होता. आज केवळ विरोधकांवर तोंडसुख घेणाऱ्या फडणवीसांमध्ये महिलांसाठी मुख्यमंत्रीपद सोडण्याचे धैर्य आहे का?”

मोहन भागवत आणि ‘आरएसएस’ला दिले आव्हान
सुषमा अंधारे यांनी केवळ टीकेवर न थांबता मुख्यमंत्र्यांना एक नवीन आव्हान दिले आहे. “तुम्ही खूप आव्हाने देता, मग महात्मा फुले यांनी लिहिलेली ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा आसूड’ ही पुस्तके राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक कार्यक्रमात वाचून दाखवणार का? आणि त्यावर मोहन भागवत यांची प्रतिक्रिया काय येते, ते तरी सांगा,” अशा शब्दांत त्यांनी संघप्रणीत विचारधारेवरही निशाणा साधला.

हेही वाचा – Gunaratna Sadavarte: ‘स्वतःला राजा समजू नका…’; गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरे अन् प्रताप सरनाईकांवर हल्लाबोल; मराठी सक्तीवरून खडाजंगी

नेमका वाद काय?
संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यावरून सत्ताधारी भाजपने काँग्रेससह सर्व विरोधकांना ‘महिला हक्कांचे मारेकरी’ म्हटले होते. देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांवर कडाडून टीका केली होती. याच टीकेचा समाचार घेण्यासाठी अंधारे यांनी पुराव्यांसह ही पत्रकार परिषद घेतली, ज्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमधील कलगीतुरा अधिकच रंगण्याची चिन्हे आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number