Suhas Kande On Sameer Bhujbal : ‘अन्न व नागरी पुरवठा भ्रष्टाचारामध्ये समीर भुजबळ सहभागी’ शिंदेंच्या आमदाराचा गंभीर आरोप; महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांचे सुपुत सुहास भुजबळ यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत.

Suhas Kande On Sameer Bhujbal : ‘अन्न व नागरी पुरवठा भ्रष्टाचारामध्ये समीर भुजबळ सहभागी’ शिंदेंच्या आमदाराचा गंभीर आरोप; महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

महायुतीतून मोठी घडामोड समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांच्यावर अनेक खळबळजनक आणि गंभीर आरोप केले आहेत. यावेळी सुहास कांदे यांनी अन्न व नागरी पुरवठा भ्रष्टाचारामध्ये समीर भुजबळ सहभागी असल्याचे म्हणत समीर भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडल्याचे पाहायला मिळाले.

अन्न व नागरी पुरवठा भ्रष्टाचारामध्ये समीर भुजबळ सहभागी असून त्यांच्यावर एसआयटी स्थापन करा, ही डिल समीर भुजबळ यांनेच केली. 600 कोटींचा भ्रष्टाचार समीर भुजबळ यांने केला असून माणिक महलमध्ये या बैठका झाल्या. असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. इतकचं नव्हे तर छगन भुजबळ यांना काही माहीत नाही सर्व समीर भुजबळ करतात असा देखील खुलासा कांदे यांनी केला आहे.

त्यामुळे सुहास कांदे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी आमदाराने मित्र पक्षावर गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अन्न व नागरी पुरवठा विभागात भ्रष्टाचार सुरू असल्याचं म्हणत भुजबळांवर निशाणा साधला असून महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number