Baramati Bypoll Election Result: संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विजयाचा नवा इतिहास रचला आहे. अवघ्या 15 व्या फेरीपर्यंतच त्यांनी असा टप्पा गाठला आहे, जो आजवर अजित पवारांनाही गाठता आला नव्हता. मतमोजणी अजून पूर्ण झालेली नसली तरी, सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या नावावर असलेला विजयाचा विक्रम मोडीत काढल्याने बारामतीत सध्या जल्लोषाचे वातावरण आहे.
रेकॉर्डब्रेक मताधिक्य: 'दादां'नाही मागे टाकलं!
2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी 1,01,000 मतांच्या फरकाने विजय मिळवत विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र, या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी अवघ्या 14 व्या फेरीतच 1,21,855 मते मिळवून हा विक्रम इतिहासजमा केला. अजित पवारांच्या विक्रमी मताधिक्याला मागे टाकत सुनेत्रा पवारांनी बारामतीवर आपली पकड घट्ट केली आहे.
सध्याची आकडेवारी (15 व्या फेरीअखेर):
सुनेत्रा पवार: 1,21,855 मते
इतर उमेदवार: 2,468 मते
महत्त्वाची बाब म्हणजे, एकूण 24 फेऱ्यांपैकी अजून 9 फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे. उर्वरित फेऱ्यांमध्ये हे मताधिक्य किती लाखांच्या घरात जाणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. पार्थ आणि जय पवार यांनी व्यक्त केलेला 'विक्रमी विजया'चा विश्वास आता खरा ठरताना दिसत आहे.
हेही वाचा – West Bengal Election Result : बंगालमध्ये 'पोरिबोर्तन' का घडलं? भाजपचा विजय, दीदींचा पराभव… नेमकी कारणं काय?
"हार कर जीतने वाले को बाजीगर कहते है"; करुणा मुंडेंची प्रतिक्रिया
या निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या उमेदवार करुणा मुंडे यांना निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 85 मते मिळाली आहेत. पराभव स्वीकारताना त्यांनी अनोखी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "माझा अर्ज वैध ठरला, त्याच दिवशी मी खरी जिंकले होते. मला रोखण्याचे प्रयत्न झाले, तरीही मी लढले. मतदारांच्या कौलाचा मी आदर करते. सुनेत्रा पवार यांनी आता राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी काम करावे."