Sunil Tatkare Meets PM Narendra Modi : मोठी बातमी! दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. नुकतीच शरद पवारांनी मोदींची भेट घेतल्यानंतर आता सुनील तटकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

Sunil Tatkare Meets PM Narendra Modi : मोठी बातमी! दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. नुकतीच शरद पवारांनी मोदींची भेट घेतल्यानंतर आता सुनील तटकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, त्यानंतर आता मोदींची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामळे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान या भेटीनंतर सुनील तटकरे यांनी एक्स अकाउंटवर मोदींसोबतच्या भेटीचे काही फोटो पोस्ट केले आहेत, तसेच त्यांनी म्हटलं की, ‘आज नवी दिल्ली येथे देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांची भेट घेऊन विविध विकासकामांच्या संदर्भात विस्तृत चर्चा केली व त्यांचे मार्गदर्शन घेतले.’ शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

हेही वाचा- Deepak Kesarkar : ‘पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये सहभागी होणार’; मोदी-पवार भेटीनंतर शिवसेना आमदार दीपक केसरकरांचं वक्तव्य

अशातच तटकरे भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाचे बहुतांशी नेते हे NDA सोबत जाण्यास तयार असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच काही नेते हे इंडिया आघाडीसोबत राहण्यास इच्छुक आहेत.

आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात का आणि शरद पवारांचा पक्ष NDA मध्ये सामील होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर शरद पवारांनी देखील मागील आठवड्यात नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीगाठीमागे नेमकं राजकारण काय आहे, याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number