मुंबई: ठाकरे बंधूंचा भव्य विजय मेळावा वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे शनिवारी पार पडला. यादरम्यान शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी पुढाकार घेत अमित ठाकरेंना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला आणि आदित्य ठाकरेंना राज ठाकरे यांच्या बाजूला उभं केलं. यावेळी, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी देखील व्यासपीठावर पुढे येत हातात हात मिळवला. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
ठाकरे बंधूंचा भव्य विजय मेळावा वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे शनिवारी पार पडला. 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आले. या सभेला मराठी प्रेमींचा मोठा जमाव उपस्थित होता. या विजयी सभेत भाषण करताना, ठाकरे बंधूंनी जोरदार टोलेबाजी केली. तसेच, कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांना व्यासपीठावर बोलावण्यात आले. यादरम्यान, व्यासपीठावर मनसे नेते अमित ठाकरे आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी, शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेंनी पुढाकार घेत अमित ठाकरेंना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला आणि आदित्य ठाकरेंना राज ठाकरे यांच्या बाजूला उभं केलं. तेव्हा, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी देखील स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवला.
कार्यक्रमाच्या शेवटी, ठाकरे बंधूंनी राजकीय क्षेत्रातील सर्व बड्या नेत्यांना व्यापीठावर बोलावले आणि त्यांचे आभार मानले. त्यासोबतच, त्यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार केला. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आले आणि फोटोसेशन केले. यादरम्यान, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुले आदित्य आणि तेजस ठाकरे हे सर्वजण एकत्र उभे राहून फोटोसेशन केले.