Sanjay Raut Call Rahul Gandhi : कॉंग्रेसची मविआमधून एक्झिट? ठाकरे बंधूंच्या युतीमुळे तणावाचे वातावरण; राऊतांचा थेट राहुल गांधीना फोन

मविआमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीमुळे कॉंग्रेस कुठे तरी नाराज असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे काँग्रसेने मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Sanjay Raut Call Rahul Gandhi : कॉंग्रेसची मविआमधून एक्झिट? ठाकरे बंधूंच्या युतीमुळे तणावाचे वातावरण; राऊतांचा थेट राहुल गांधीना फोन

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल काल समोर आला. या निवडणूकांमध्ये भाजपने बाजी मारली आहे. या निवडणूकींमध्ये भाजपचे 129 नगरसेवक निवडून आले आहेत. राज्यातील 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणूक 27 नगर परिषदांसाठी पार पडली. त्यापैकी 22 ठिकाणी भाजपाने यशस्वी निवडणूक जिंकली. त्यानंतर मविआ सतर्क झाली असून मविआमध्ये अंतर्गत वाद पाहायला मिळतो आहे.

हेही वाचा- Devendra Fadnavis : नगरपरिषदांमधील विजय, माज अन् मात…; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

मविआमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीमुळे कॉंग्रेस कुठे तरी नाराज असल्याचं दिसून येत आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधूंसोबत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंशी युती करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुंबईतील स्थानिक नेते अनुकूल असल्याचे समजते. तर दुसरीकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या जागावाटपाच्या चर्चा अंतीम टप्प्यात आल्या असून ठाकरे बंधू आज किंवा उद्या युती जाहीर करू शकतात.

हेही वाचा- Mohol Election : राजन पाटलांची 30 वर्षांची सत्ता 22 वर्षांच्या मुलीने उलथवली ! मोहोळमध्ये सिद्धी वस्त्रेचा करिश्मा

याचपार्श्वभूमिवर ठाकरे बंधूंच्या युतीमुळे काँग्रसेने मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रसेचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी ही घोषणा केली. मनसेसोबतच्या युतीसोबतच कॉंग्रेस देखील मविआमध्ये कायम रहावी यासाठी शिवसेनेकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मविआमध्ये झालेल्या या बिघाडावर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number