Shivsena UBT MP’s PC : ‘तुम्हाला जायचं असेल तर राजीनामा द्या, मागच्या वेळेची पुनरावृत्ती झाली तर…’; ठाकरेंच्या निष्ठावंत खासदारांनी बंड करणाऱ्यांना सुनावले खडेबोल

नवी दिल्ली : शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी बुधवारी दिल्लीच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, पक्षात फूट पडण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पक्ष कायदेशीर लढाईची तयारी करत आहे. तसेच त्यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता उबाठाच्या संसदीय पक्षाची बैठक होणार असल्याची घोषणा केली. राऊत यांनी दावा केला की, 14 जून रोजी पक्षाच्या खासदारांच्या बैठकीत काही खासदारांनी साईबाबा आणि माता भवानी […]

Shivsena UBT MP’s PC : ‘तुम्हाला जायचं असेल तर राजीनामा द्या, मागच्या वेळेची पुनरावृत्ती झाली तर…’; ठाकरेंच्या निष्ठावंत खासदारांनी बंड करणाऱ्यांना सुनावले खडेबोल

नवी दिल्ली : शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी बुधवारी दिल्लीच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, पक्षात फूट पडण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पक्ष कायदेशीर लढाईची तयारी करत आहे. तसेच त्यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता उबाठाच्या संसदीय पक्षाची बैठक होणार असल्याची घोषणा केली. राऊत यांनी दावा केला की, 14 जून रोजी पक्षाच्या खासदारांच्या बैठकीत काही खासदारांनी साईबाबा आणि माता भवानी यांची शपथ घेऊन पक्षाप्रती आपली निष्ठा पुन्हा एकदा व्यक्त केली होती. “शपथ घेऊनही जर त्यांना आपल्या मातेशी म्हणजेच उबाठाशी गद्दारी करायची असेल, तर आम्ही त्यांना सोडणार नाही,” असे ते म्हणाले. तसेच, हे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेमुळे नाही, तर उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आणि प्रचार यांच्या जोरावर निवडून आले होते, असेही राऊत यांनी ठामपणे सांगितले.

हेही वाचा : MP Omraje Nimbalkar : राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले खासदार ठाकरेंची साथ सोडणार?, शिवसेना प्रवेशाबाबत निर्यण काय?; जाणून घ्या ताजी घडामोड

खासदार संजय राऊत यांनी आरोप केला की, पक्ष बदलण्यासाठी प्रत्येक बंडखोर खासदाराला 15 कोटी रुपये देण्यात आले. त्यांनी सांगितले की, यात सामील असलेल्यांची नावे गुरुवारी स्पष्ट होतील. कारण त्या दिवशी पक्षाच्या संसदीय गटाची बैठक होणार आहे. शिवसेना (उबाठा) मध्ये फूट पडण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, पक्षाचे नेते संजय राऊत यांनी या घडामोडींचे वर्णन ‘ऑपरेशन टायगर’ असे केले. तसेच पक्षात एकजूट असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला. राऊत यांनी नमूद केले की, त्यांच्यासोबत उबाठाचे लोकसभेतील नेते अरविंद सावंत, मुख्य प्रतोद अनिल देसाई आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते. तसेच ‘मातोश्री’वर नुकत्याच झालेल्या बैठकीला पाच खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. तर उर्वरित सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना (उबाठा) गटात फूट पडण्याच्या वाढत्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पक्षांतरविषयक अफवांचे खंडन केले. पक्ष सोडण्याच्या कोणत्याही योजनेबाबत एकाही खासदाराने नेतृत्वाला कल्पना दिलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तर खासदार अरविंद सावंत म्हणाले की, घटनात्मक नियमांचे संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. “आतापर्यंत पक्षातील एकाही नेत्याने आपण पक्ष सोडत असल्याचे आम्हाला सांगितलेले नाही,” असे म्हणत त्यांनी उबाठा गटावरील आपला विश्वास व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number