ठाणे महापालिकेतील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडिल युनूस खान यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगली आहे. एमआयएमचा नेता असूनही त्यांनी कट्टर हिंदुत्ववादी मानल्या जाणाऱ्या शिंदे सेनेत प्रवेस कसा केला, यावरुन अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, सध्या युनूस खान यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत.
ते म्हणाले,”केबल हा माझा व्यवसाय आहे. शिंदे साहेबांनी मला केबल सेना अध्यक्ष हे पद दिले आहे. पद देत असताना त्यांनी मला पक्षाचा गमछा घातला, ही त्यांची परंपरा आहे. याचा अर्थ मी शिवसेनेत गेलो असे नाही. शिंदे साहेबांसोबत माझे जुने संबंध आहेत. संकटकाळी ते माझ्या पाठीशी उभे राहिले.” खरं तर मी ज्या पक्षामुळे प्रसिद्ध झालो, त्या एमआयएममध्येच आहे. मिळालेले पद हे माझ्या व्यवसायाशी संबंझित आहे. मी मुंब्राच्या नागरिकांसाठी एमआयएममध्येच राहून काम करणार आहे,” असे स्पष्टीकरण युनूस खान यांनी दिले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.