Bhimrao Ambedkar Speech: भीमा कोरेगाववर झालेला हल्ला सरकारचा नियोजित कट होता; भीमराव आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

भीमराव आंबेडकर यांनी आपल्या भाषणात भाजपवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, 'भीमा कोरेगाव येथे झालेला हल्ला हा सरकारचा नियोजित कट होता.'

Bhimrao Ambedkar Speech: भीमा कोरेगाववर झालेला हल्ला सरकारचा नियोजित कट होता; भीमराव आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

Bhimrao Ambedkar Speech: या देशामध्ये शूरांचा इतिहास गाडला गेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडच्या ग्रंथालयातून हा इतिहास शोधून काढला आणि जगासमोर आणला, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि ग्लोबल रिपब्लिकन पार्टीचे नेते भीमराव यशवंत आंबेडकर यांनी म्हटलं. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी तत्कालीन घटनांवर भाष्य करताना भाजप सरकारवर गंभीर आरोपही केले.

भीमा कोरेगाव हल्ला हा सरकारी कट 

भीमराव आंबेडकर यांनी आपल्या भाषणात भाजपवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, ‘भीमा कोरेगाव येथे झालेला हल्ला हा सरकारचा नियोजित कट होता. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मी या बातम्या अमेरिकेपर्यंत पोहोचवल्या होत्या, जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावर या अन्यायाची दखल घेतली जाईल.’

पेशवाईतील अन्यायाविरुद्धचा एल्गार

भीमा कोरेगावच्या लढाईचे महत्त्व अधोरेखित करताना भीमराव आंबेडकर म्हणाले की, हा केवळ दोन सैन्यांमधील लढा नव्हता, तर तो सामाजिक क्रांतीचा टप्पा होता. पेशवाईच्या काळात महार समाजावर लादलेले अमानवीय निर्बंध अत्यंत जाचक होते. या अन्यायाविरुद्ध आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी 500 महार सैनिकांनी 28 हजार पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध शौर्य गाजवले. हा लढा सत्तेसाठी नसून जातिव्यवस्थेविरुद्धचा आत्मसन्मानाचा लढा होता.

हेही वाचा – Municipal Election Result 2026 : निकालाआधीच विजयी पताका! भाजपचे 7 उमेदवार बिनविरोध विजयी

विजयस्तंभ आणि शौर्य दिनाचे महत्त्व

दरम्यान, 1851 मध्ये ब्रिटिशांनी उभारलेल्या 75 फूट उंच विजयस्तंभाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, 1 जानेवारी 1927 रोजी बाबासाहेबांनी या स्तंभाला भेट देऊन अस्पृश्यांच्या संघर्षाची ओळख जगाला करून दिली. तेव्हापासून हा दिवस ‘शौर्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. आज येथे येणारे लाखो लोक याच प्रेरणेतून एकत्र येतात.

हेही वाचा – Ramdas Athawale vs Raj Thackeray : राज ठाकरेंची भाषणं भारी, पण पाटी कोरी…; रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर कविता

भीमराव आंबेडकरांची राजकीय व सामाजिक वाटचाल

डॉ. बाबासाहेबांचे नातू आणि दिवंगत भैय्यासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव असलेल्या भीमराव आंबेडकरांनी आपल्या कार्याचा विस्तार देशभर केला आहे. त्यांनी 2024 मध्ये पंजाबमधील होशियारपूर (SC) मतदारसंघातून ‘ग्लोबल रिपब्लिकन पार्टी’तर्फे लोकसभा निवडणूक लढवून पंजाबच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. ते ‘समता सैनिक दला’च्या माध्यमातून सामाजिक एकता आणि संरक्षणासाठी मेळावे घेत आहेत. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून ते धम्म प्रचारासाठी आणि समाजाच्या धार्मिक हक्कांसाठी देशभर कार्य करत आहेत. तथापी, भीमराव आंबेडकरांच्या भाजप विरोधी या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number