Local Elections Symbols : सफरचंद, बिस्कीट, पाव, केक… अपक्षांना निवडणूक आयोगाकडून 194 मुक्त चिन्हांचं वाटप

जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दरम्यान अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने तब्बल 194 चिन्हे उपलब्ध करून दिली.

Local Elections Symbols : सफरचंद, बिस्कीट, पाव, केक… अपक्षांना निवडणूक आयोगाकडून 194 मुक्त चिन्हांचं वाटप

जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दरम्यान अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने तब्बल 194 चिन्हे उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये विविध चिन्हाचा समावेश केला गेला असून यात खाण्याची चिन्हेही वापरण्यात आली आहेत. यात सफरचंद, बिस्कीट, पाव, केक, ढोबळी मिरची, फुल कोबी, नारळ, ऊस, आले, द्राक्ष, हिरवी मिरची, फणस , भेंडी , मका, भुईमूग, वाटाणे, पेर , अननस, कलिंगड, आक्रोड, जेवणाची थाळी अशा चिन्हांचा समावेश आहे.

राज्य निवडणुक आयोगाकडे अमान्य प्राप्त पण नोंदणीकृत अशा 416 पक्षानी नोंदणी केली. त्यांना मान्यताप्राप्त पक्ष श्रेणीतील राखीव चिन्हे न देता स्वतंत्र चिन्हे दिली जाणार आहेत. तसेच राज्य निवडणुक आयोगाने एकूण 19 राजकीय पक्षाची चिन्हे राखून ठेवली आहेत. उमेदवारी अर्ज भरताना तीन मुक्तचिन्हे नमूद करणे बंधनकारक असणार असून वाहन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चिन्हे देखील मुबलक आहेत. 26 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीनंतर आणि त्यानंतर होणाऱ्या निवडणूक चिन्हांच्या वाटपाने स्पष्ट होणार आहे. निवडणूक चिन्ह वाटपासाठी विशिष्ट क्रम पाळला जातो.

राष्ट्रीय स्तरावरील पाच पक्ष, राज्यस्तरीय पाच पक्ष आणि इतर राज्यातील राज्यस्तरीय नऊ पक्षांची चिन्हे राखीव आहेत. यात शिल्लक राहणारी मुक्त चिन्हे अपक्ष उमेदवारांना दिली जातात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराचे नाव मतदारांच्या लक्षात राहीलच असे नाही, पण निवडणूक चिन्ह हे मतदारांच्या लक्षात राहते. त्यात पण जर ते मतदार ग्रामीण आणि कमी शिक्षित असतील तर त्यांच्यासाठी चिन्हावरुन उमेदवाराला मतदान करण सोपे पडले आणि उमेदवाराला त्यांच्या मनात त्वरित स्थान मिळवते.

यामुळेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये लक्षवेधक आणि आकर्षक चिन्ह मिळवण्यासाठी अपक्ष उमेदवारांचा कल असतो. उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक अपक्ष उमेदवाराला त्यांच्या आवडीचे 3 चिन्ह द्यावे लागतात. त्यात पण जर एकापेक्षा जास्त उमेदवारांकडून एकाच चिन्हाची मागणी झाल्यास निवडणूक अधिकारी अडचणीत पडतो. यावेळी प्रथम अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार उमेदवारांमध्ये चिन्हांचे वाटप केले जाते. त्यानुसार आता 25 नोव्हेंबरला चिन्हांचे वाटप झाल्यानंतर कोणता उमेदवार कोणता चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरतो हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number