NCP Pune MLC Candidate : पुण्यातील हायव्होल्टेज ड्रामा संपला! अखेर ‘या’ नेत्याला मिळाला राष्ट्रवादीचा एबी फॉर्म

पुणे मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ येत असतानाच राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

NCP Pune MLC Candidate : पुण्यातील हायव्होल्टेज ड्रामा संपला! अखेर ‘या’ नेत्याला मिळाला राष्ट्रवादीचा एबी फॉर्म

NCP Pune MLC Candidate : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार कोण असणार, याबाबत दिवसभर सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पक्षाकडून विक्रम काकडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्याच नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामुळे गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना नवा कलाटणी मिळाली आहे.

उमेदवारीवरून दिवसभर रंगल्या चर्चा

पुणे मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ येत असतानाच राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या हालचाली सुरू झाल्या होत्या. माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केल्याने वातावरण अधिकच तापले होते. याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये अनेक फेऱ्यांच्या बैठका आणि चर्चाही पार पडल्या.

पक्षप्रवेशानंतर काकडेंना उमेदवारी

आज सकाळी विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर लगेचच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत संजय काकडे यांनीही पक्षात प्रवेश केल्याने या राजकीय घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले.

सुनिल टिंगरेंचाही अर्ज, चर्चांना उधाण

दरम्यान, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल टिंगरे यांनाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आल्याची माहिती समोर आल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पक्षाकडून नेमका अधिकृत उमेदवार कोण, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले. एबी फॉर्मबाबतही स्पष्टता नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांचा जोर वाढला होता.

हेही वाचा – Thackeray Shinde Sena: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? दानवेंचं वक्तव्य पक्षश्रेष्ठी गांभीर्याने घेणार?

काकडेंच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब

अखेर पक्ष नेतृत्वाने विक्रम काकडे यांनाच अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता दिली. त्यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच सुनिल टिंगरे यांनी अर्ज भरला असला तरी ते डमी उमेदवार म्हणून निवडणूक प्रक्रियेत सहभागी असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

पक्षातील नाराजी कमी करण्याचे आव्हान

विक्रम काकडे यांच्या उमेदवारीमुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष नेतृत्व नाराज गटांना कशाप्रकारे समजावून घेते आणि एकजूट टिकवते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number