Voter ID Photo Mismatch : नाव रवींद्र अन् फोटो महिलेचा… पुण्यात मतदाराची झाली मोठी पंचाईत, पाहा व्हिडीओ

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत मतदार यादीतील गोंधळामुळे एका पुरुषाच्या नावासमोर चक्क महिलेचा फोटो छापून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Voter ID Photo Mismatch : नाव रवींद्र अन् फोटो महिलेचा… पुण्यात मतदाराची झाली मोठी पंचाईत, पाहा व्हिडीओ

Voter ID Photo Mismatch : एखाद्या महिलेचं नाव रवींद्र असू शकतं का? असा संतप्त सवाल विचारत पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला चक्क स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत मतदार यादीतील गोंधळामुळे एका पुरुषाच्या नावासमोर चक्क महिलेचा फोटो छापून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यामुळे निवडणूक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नेमका प्रकार काय? 

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी रवींद्र नावाचे एक काका उत्साहाने मतदान केंद्रावर पोहोचले होते. मात्र, जेव्हा त्यांनी मतदार यादीत आपले नाव तपासले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. यादीत नाव ‘रवींद्र’ हेच होते, मात्र त्या नावापुढील फोटो एका अनोळखी महिलेचा होता. या गंभीर चुकीबद्दल काकांनी केंद्रावरील अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, सुरुवातीला अधिकाऱ्यांनी यावर समाधानकारक उत्तर न देता आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – Jalgaon Election 2026: जळगाव मनपा निवडणूक; कुठे ईव्हीएमचा क्रम चुकला, तर कुठे खोली क्रमांक, मतदारांमध्ये संताप

आधार कार्डच्या पुराव्यानंतर केले मतदान

फोटोच्या चुकीमुळे मतदान नाकारले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने रवींद्र काकांनी तातडीने घर गाठले. त्यांनी आपले आधार कार्ड आणून आपणच ‘रवींद्र’ आहोत आणि आपण पुरुष आहोत, हे कायदेशीर पुराव्यासह सिद्ध केले. या पुराव्यानंतरच त्यांना मतदानाचा हक्क बजावू देण्यात आला. मात्र, एका साध्या चुकीमुळे ज्येष्ठ नागरिकाला जो मानसिक मनस्ताप सहन करावा लागला, त्याबद्दल नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

हेही वाचा – Nagpur Election 2026: देवेंद्र फडणवीसांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क; रांगेत उभे राहून केले मतदान

निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीकेची झोड 

निवडणूक आयोगाकडून वारंवार ‘हायटेक’ आणि अद्ययावत मतदार याद्यांचे दावे केले जातात. मात्र, मतदानाच्या दिवशीच समोर आलेल्या या प्रकारामुळे या दाव्यांचे वाभाडे निघाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ ‘X’ (ट्विटर) वर व्हायरल झाल्यापासून नेटकरी निवडणूक आयोगाच्या ‘भोंगळ’ कारभारावर मिम्स आणि टीकेचा वर्षाव करत आहेत. प्रशासनाने किमान नावे आणि फोटो यांची शहानिशा करायला हवी होती. जर रवींद्र नावाच्या पुरुषाला स्वतःची ओळख पटवण्यासाठी असे पुरावे द्यावे लागत असतील, तर यादी शुद्धीकरण मोहिमेचा अर्थ काय? असा संतप्त सवाल सोशल मीडियावरून विचारला जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number