Pimpri Chinchwad Election : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राष्ट्रवादी’ची युती तुटली ! अमोल कोल्हेंच्या मध्यस्थीला अपयश

खासदार अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यातील सकारात्मक चर्चेनंतर युती होईल असे वाटत असतानाच, आता ही चर्चा पूर्णपणे थांबली आहे.

Pimpri Chinchwad Election : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राष्ट्रवादी’ची युती तुटली ! अमोल कोल्हेंच्या मध्यस्थीला अपयश

Pimpri Chinchwad Election: 'पुणे पॅटर्न'प्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील मनोमिलनाचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. खासदार अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यातील सकारात्मक चर्चेनंतर युती होईल असे वाटत असतानाच, आता ही चर्चा पूर्णपणे थांबली आहे. परिणामी, दोन्ही पक्ष आता स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

राजकारणात नवा ट्विस्ट: शिवसेना-अजित पवार गट एकत्र?

एककीकडे शरद पवार गटाशी चर्चा फिस्कटली असतानाच, अजित पवार गटाने आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे मैत्रीचा हात सरसावला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद यांनी माहिती दिली की, दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक आणि सकारात्मक बोलणी पूर्ण झाली असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल.

हेही वाचा – PMC Election 2026: पुण्यात मनसेचा 'या' पक्षासोबत निवडणूक लढण्यास नकार; महाविकास आघाडीच्या बैठकीकडे फिरवली पाठ

भाजप-शिवसेना युतीचे काय?

दोनच दिवसांपूर्वी भाजप आणि शिवसेनेने एकत्रित लढण्याचे संकेत दिले होते. मात्र, तासाभरातच शिवसेनेने राष्ट्रवादीशी (अजित पवार गट) हातमिळवणी करण्याच्या हालचाली सुरू केल्याने महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे. पुण्यातील युती का तुटली, याचे मुख्य कारण आता समोर आले आहे. शरद पवार गटाचे पदाधिकारी जेव्हा अजित पवारांना भेटले, तेव्हा त्यांनी 'जागावाटपावर आमचे एकमत आहे, पण संपूर्ण निवडणूक राष्ट्रवादीच्या पारंपरिक 'घड्याळ' चिन्हावरच लढवावी लागेल,' अशी अट घातली. मात्र, शरद पवार गट आपल्या 'तुतारी' चिन्हावर ठाम असल्याने चिन्हाच्या मुद्द्यावरून दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली. पुण्याचा हाच कित्ता आता पिंपरी-चिंचवडमध्येही गिरवला गेल्याचे दिसते.

हेही वाचा – Sandeep Raut : संसदेत संजय, विधानसभेत सुनील अन् आता पालिकेत संदीप; संजय राऊतांचे धाकटे बंधू संदीप राऊत निवडणुकीच्या रिंगणात

पिंपरी-चिंचवडमधील सध्याची स्थिती 

दरम्यान, आता शरद पवार गट स्वबळावर किंवा महाविकास आघाडीतील इतर पक्षांसोबत जाण्याच्या तयारीत आहे. तसेच अजित पवार गट शिवसेनेसोबत (शिंदे गट) नव्या युतीची चाचपणी करत आहे. भाजप शिवसेनेच्या या नव्या भूमिकेनंतर भाजप आता काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number