Wednesday, January 14, 2026 01:28:44 PM

Ladki Bahin Yojana: आता लाडक्या बहिणींना दुप्पट लाभ! डिसेंबरमध्ये 1500 नाही तर 3000 रुपये खात्यात जमा होणार; कारण काय?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीवर महायुती सरकार लाडक्या बहिणींना एक खास भेट देणार आहे. राज्य सरकार डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात एक सोडून दोन हप्ते जमा होणार आहेत.

ladki bahin yojana आता लाडक्या बहिणींना दुप्पट लाभ डिसेंबरमध्ये 1500 नाही तर 3000 रुपये खात्यात जमा होणार कारण काय

महायुती सरकारसाठी विधानसभा निवडणुकीतील विजयाचा टर्निंग पॉंईट ठरलेली महिलांसाठीची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. दरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भात आतापर्यंत अनेक नवनवीन अपडेट समोर येताना पाहायला मिळाल्या. तसेच योजनेअंतर्गत होणाऱ्या अनेक घोटाळ्यांवर बंधन घालण्यासाठी सरकारकडून या योजनेवर विशेष लक्ष्य देत प्रत्येक लाभार्थी महिलेच्या माहितीची कसून तपासणी करण्यात आली.

हेही वाचा- Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची चिंता; खात्यात पैसे कधी जमा होणार?

अशातच सध्या राज्यभर सुरु असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीवर महायुती सरकार लाडक्या बहिणींना एक खास भेट देणार आहे. राज्य सरकार डिसेंबर महिन्यात 1500 रुपये नाही तर 3000 रुपये जमा करणार आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यात एक सोडून दोन हप्ते जमा होणार आहेत. नोव्हेंबर महिना संपला असून डिसेंबर महिना सुरु होऊन देखील 5 दिवस होत आले आहेत. मात्र तरी देखील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही.

याचपार्श्वभूमिवर लाडक्या बहीणी निराश होऊ नये यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचा हफ्ता एकत्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांचे बिगुल मोठ्या प्रमाणात सुरु होते, त्यामुळे या योजनेला तात्पुर्ती स्थगिती लावण्यात आली होती. त्यामुळे आता पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारने याविषयीची कोणताही अधिकृत घोषणा केलेली नाही.

हेही वाचा- Ladki Bahin Yojana Update : मोठी बातमी! लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा दिलासा, अदिती तटकरेंनी दिली माहिती

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेमधून महाराष्ट्रातील अनेक महिलांना थोडाफार आर्थिक हातभार लावला. 2024 मध्ये सुरु करण्यात आलेली ही योजना आर्थिक दृष्टिकोनातून अडचणीत असलेल्या महिलांसाठी महत्त्वाची ठरली आहे. या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचा सन्माननिधी थेट डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात जमा होतो. योजनेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने या योजनेत ई‑KYC प्रक्रिया सक्तीची केली आहे. त्यामुळे EKYC लवकर पूर्ण करणे आणि हप्त्याची माहिती तपासणे प्रत्येक लाभार्थीच्या हिताचे आहे.


सम्बन्धित सामग्री