सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी आज मतदान; तर उद्या मतमोजणी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज मतदान प्रकिया पार पडत आहेत.
baramati someshwar sugar factory election
baramati someshwar sugar factory election

नवनाथ बोरकर, प्रतिनिधी 

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज, रविवारी मतदान प्रकिया पार पडत आहेत. 93 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा पुणे जिल्ह्यात आहे. यात मतदारांची संख्या 27,700 असून 21 जागेसाठी 83 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी सुमारे 750 कर्मचारी आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी 8 ते 5 मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

हेही वाचा : देवीची ज्योत घेऊन येणाऱ्या तीन तरुणांची जीवनज्योत विझली; आयशरने दुचाकीला दोन किमी फरफटत नेलं

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ब वर्ग प्रतिनिधी म्हणून इंजीनियरिंग कॉलेज या ठिकाणी सकाळी 9 वाजता आपला मतदानाचा हक्क बजावला. आज शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. यावेळी, मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. आज सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचे मतदान पार पडत आहे. आज मी देखील मतदान केले आहे. सर्वत्र उत्साह पाहायला मिळत असल्याने विजय निश्चित असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version