PMC Election 2026: पती जेलमध्ये, पत्नी निवडणुकीच्या मैदानात ! कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला ‘या’ पक्षाकडून उमेदवारी

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने यंदाची निवडणूक 'तिंरगी' होण्याची चिन्हे असतानाच, अजित पवार गटाने दिलेल्या उमेदवारीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.<br/>

PMC Election 2026: पती जेलमध्ये, पत्नी निवडणुकीच्या मैदानात ! कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला ‘या’ पक्षाकडून उमेदवारी

PMC Election 2026: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 'जिजाऊ' निवासस्थान राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने यंदाची निवडणूक 'तिंरगी' होण्याची चिन्हे असतानाच, अजित पवार गटाने दिलेल्या उमेदवारीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. आज सकाळपासूनच अजित पवार यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी आणि इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे. रुपाली ठोंबरे पाटील, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते 'एबी' फॉर्म आणि रणनीतीसाठी पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. याच गदारोळात राष्ट्रवादीने (अजित पवार गट) कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – Jalgaon: अर्ज भरला, पण एबी फॉर्म मिळालाच नाही! महापालिका निवडणुकीत निष्ठावंत महिला उमेदवाराचे अश्रू अनावर

'गुन्हेगारी मुक्त' पुण्याच्या घोषणेचे काय?

नेहमीच "गुन्हेगारी मोडीत काढू" अशी भूमिका घेणाऱ्या अजित पवारांनी जयश्री मारणे यांना प्रभाग 10 (बावधन) मधून उमेदवारी दिल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आठ दिवसांपूर्वीच जयश्री मारणे यांनी बारामती हॉस्टेलवर दादांची भेट घेतली होती, तेव्हापासूनच त्यांच्या उमेदवारीची चर्चा होती.

कोण आहेत जयश्री मारणे? 

जयश्री मारणे या 2012 मध्ये मनसेच्या तिकिटावर कोथरूडमधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. 2022 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

हेही वाचा – BMC Election 2026 : शिवसेनेत घराणेशाही! सदा सरवणकरांच्या घरातच दोघांना तिकीट, समाधान सरवणकर आणि प्रिया सरवणकरांना उमेदवारी जाहीर

पुण्याच्या राजकारणात 'गँगवॉर'ची सावली?

यंदाच्या निवडणुकीत केवळ मारणे टोळीच नव्हे, तर इतरही गुन्हेगारी टोळ्यांचे कनेक्शन समोर येत आहे. आंदेकर टोळीतील तिघांनी निवडणुकीसाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. तर लंडनला पळालेल्या निलेश घायवळचा भाऊदेखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. गुन्हेगारी विश्वातील या सक्रियतेमुळे पुणे महापालिकेची निवडणूक यंदा शांततेत पार पडणार की टोळीयुद्ध राजकारणात शिरणार, अशी भीती व्यक्त होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number