Amit Thackeray: ‘हा व्यवस्थेने केलेला नरसंहार…’; NEET पेपरफुटीवरून अमित ठाकरेंचा केंद्र आणि NTA वर विखारी हल्ला

NTA च्या ढिसाळ नियोजनामुळे भारत आणि महाराष्ट्रातील तब्बल 22,00,000 विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.<br/>

Amit Thackeray: ‘हा व्यवस्थेने केलेला नरसंहार…’; NEET पेपरफुटीवरून अमित ठाकरेंचा केंद्र आणि NTA वर विखारी हल्ला

Amit Thackeray: देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. “ज्या प्रामाणिक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवली, हा भ्रष्ट व्यवस्थेने केलेले खून आहेत,” अशा शब्दांत त्यांनी सरकार आणि प्रशासनावर प्रहार केला आहे. NTA च्या ढिसाळ नियोजनामुळे भारत आणि महाराष्ट्रातील तब्बल 22,00,000 विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.

गुणवत्तेचा लिलाव आणि पालकांची लूट
अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये शिक्षण माफियांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणतात की, ज्यांच्याकडे पैसा आहे तेच डॉक्टर बनणार का? 650 पेक्षा जास्त गुण मिळवण्याची क्षमता असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांनी यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे जीव का द्यावा, असा सवाल त्यांनी विचारला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन विकून किंवा कर्ज काढून मुलांच्या क्लासेसची फी भरली, मात्र परीक्षेच्या दिवशीच शिक्षण माफियांनी या मेहनतीवर पाणी फेरले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – NEET Paper Leak Case: प्राध्यापिका मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी; नीट पेपरफुटी प्रकरणी आता होणार आणखी मोठे खुलासे?

घोटाळ्याचे केंद्र महाराष्ट्र; तपासातील धक्कादायक माहिती
या रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्रातील शैक्षणिक केंद्रांशी जोडले गेल्याबद्दल त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला आहे. CBI तपासाचा संदर्भ देत त्यांनी नमूद केले की, NTA च्या पेपर सेटिंग पॅनेलमध्ये असलेले लातूरचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातून मूळ प्रश्नपत्रिका आणि उत्तरे कोट्यवधी रुपयांना विकली गेल्याचा संशय आहे. हे जाळे पुणे, नाशिक, अहिल्यानगरपासून ते थेट हरियाणातील गुरुग्रामपर्यंत पसरले असून, एक-एक पेपर 15 ते 20 लाख रुपयांना विकला गेल्याची माहिती समोर येत आहे.

केवळ ‘परीक्षा रद्द’ हा उपाय नाही; मालमत्ता जप्तीची मागणी
अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले की, केवळ परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचा मनस्ताप कमी होणार नाही. त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, केवळ गुन्हेगारच नव्हे तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्याही मुसक्या आवळल्या पाहिजेत. या क्षेत्राला कलंकित करणाऱ्या शिक्षण संस्था आणि प्राध्यापकांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई झाली पाहिजे, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. हा लढा केवळ एका परीक्षेचा नसून देशातील प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेचा असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number