Sahar Shaikh: मुंब्रा नगरसेविका सहर शेख यांच्या अडचणीत वाढ; बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी आता फॉरेन्सिक चौकशीची टांगती तलवार

बोगस जात प्रमाणपत्राच्या आरोपांनंतर आता या प्रकरणातील कागदपत्रांची फॉरेन्सिक चाचणी करण्याची मागणी तक्रारदाराने केली असून, यामुळे शेख पिता-पुत्रीच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे.<br/>

Sahar Shaikh: मुंब्रा नगरसेविका सहर शेख यांच्या अडचणीत वाढ; बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी आता फॉरेन्सिक चौकशीची टांगती तलवार

Sahar Shaikh: आपल्या आक्रमक भाषणांमुळे चर्चेत आलेल्या एमआयएमच्या (MIM) मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांच्याभोवती कायदेशीर कचाटा अधिकच घट्ट होताना दिसत आहे. बोगस जात प्रमाणपत्राच्या आरोपांनंतर आता या प्रकरणातील कागदपत्रांची फॉरेन्सिक चाचणी करण्याची मागणी तक्रारदाराने केली असून, यामुळे शेख पिता-पुत्रीच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
सहर शेख यांनी निवडणुकीत सादर केलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा करत जावेद शेख यांनी तक्रार दाखल केली होती. यावर युनूस शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, मात्र तक्रारदाराने आता त्यांच्या पुराव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. युनूस शेख यांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असून त्यावर सरकारी अधिकाऱ्यांच्या हुबेहूब खोट्या सह्या आणि शिक्के असल्याचा खळबळजनक आरोप जावेद शेख यांनी केला आहे.

फॉरेन्सिक चाचणीची मागणी का?
तक्रारदार जावेद शेख यांच्या मते, युनूस शेख यांनी केवळ कागदपत्रेच नव्हे तर प्रशासनाचीही दिशाभूल केली आहे. "ज्या पुराव्यांच्या आधारे ते स्वतःला खरे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या कागदपत्रांवरील स्वाक्षऱ्यांची सत्यता पडताळण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी होणे अनिवार्य आहे," असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या सुनावणीला युनूस शेख गैरहजर राहिल्याने त्यांच्यावरील संशयाची सुई अधिक गडद झाली आहे.

हेही वाचा – Gunaratna Sadavarte: 'स्वतःला राजा समजू नका…'; गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरे अन् प्रताप सरनाईकांवर हल्लाबोल; मराठी सक्तीवरून खडाजंगी

राजकीय आणि कायदेशीर पेच
'कैसे हराया' या आपल्या प्रसिद्ध संवादामुळे चर्चेत आलेल्या सहर शेख यांच्यासाठी हा कायदेशीर लढा अस्तित्वाची लढाई ठरण्याची शक्यता आहे. जर फॉरेन्सिक चाचणीत कागदपत्रे किंवा स्वाक्षऱ्या बनावट आढळल्या, तर सरकारी शिक्क्यांचा गैरवापर आणि फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्याखाली त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. या प्रकरणाच्या निकालानंतर सहर शेख यांचे नगरसेवक पदही धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर ठाणे महापालिका प्रशासन आणि पोलीस काय पावले उचलतात, याकडे मुंब्रावासियांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number