Uday Samant : दादांच्या परीक्षेत पास झालो होतो, सामंतांचं गुलाबी उपरणे ठरले चर्चेचा विषय

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या सांगता सभेला हजेरी लावली होती.

Uday Samant : दादांच्या परीक्षेत पास झालो होतो, सामंतांचं गुलाबी उपरणे ठरले चर्चेचा विषय

अजित पवार यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. दरम्यान आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून उदय सामंत आणि रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या सांगता सभेला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी गुलाबी उपरणे परिधान केलेल पाहायला मिळाले. 

हेही वाचा- Sunetra Pawar : “दादांच्या अपघाताबाबत माझ्या मनात देखील अनेक शंका” बारामतीमधील सभेत सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या
यावेळी उदय सामंत म्हणाले की, “माझी अजित दादा यांच्यासोबत माझी पहिली भेट झाली, अजितदादांनी परीक्षा घेतली होती, काय परीक्षा घेतले हे सांगणे व्यासपीठ नाही… माझी परीक्षा घेतली त्यामध्ये मी पास झालो, तेव्हापासून माझा प्रवास सुरू झाला. ज्या दिवशी अजित पवार यांच्या अपघाताची घटना घडली त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब बारामतीमध्ये होते त्यानंतर शिंदे साहेब दोन दिवस कोणाशी बोलत नव्हते. नंतर हिंमत करून वहिनींनी शिंदे साहेबांशी बोलण्याचे धाडस केले, तेव्हा साहेब म्हणाले काय बोलू मला अजूनही दादा माझ्या उजव्या डाव्या बाजूला असल्यासारखे वाटतात. आजचा सकाळी आम्ही शिवसेनाचा एक मेळावा घेतला आणि आम्ही ठरवले आहे की, वाहिनी जरी राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्या तरी सर्वांनी त्या शिवसेनेच्या उमेदवार आहे असे समजून काम केले पाहिजे, असं सज्जड दम शिंदे साहेबांनी ऑनलाईन दिला आहे. त्यामुळे ते मोठ्या मत्ताधिक्यांनी निवडून येतील हा मला विश्वास आहे.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number