मुंबई: हिंदी सक्तीचा जीआर सरकारने रद्द केल्याने आज वरळी डोम येथे ठाकरे बंधूंचा मेळावा पार पडला. यावेळी एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असे म्हणत मनसे-ठाकरे गटाच्या युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी सूचक वक्तव्य केले आहे. आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला. आज अनेक बुवा, महाराज व्यस्त असतील. कुणी लिंबू, रेडे कापतंय तर कुणी गावी जाऊन तंत्रमंत्र मारतोय असा निशाणा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसह शिंदेंवर साधला. वापरायचं आणि फेकून द्यायचं ही भाजपाची निती आहे. आता आम्ही दोघं तुम्हाला फेकून देणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी महायुतीला दिला आहे.
बऱ्याच वर्षांनी माझी आणि राजची भेट मंचावर झाली. पंचायत अशी झाली त्याने सन्माननीय असे उल्लेख केला. सन्माननीय राज ठाकरे यांनी अप्रतिम मांडणी केलेली आहे. सगळ्याचं लक्ष याच भाषणकडे होतं. भाषणपेक्षा एकत्रित दिसणे महत्वाचे आहे. मराठी वज्रमूठ दाखवली त्यांचे आभार उद्धव यांनी मानले आहेत. आमच्यातला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा : ठाकरे बंधूंना एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांनाही जमलं नाही, पण फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला
'भाजप ही अफवांची फॅक्टरी'
उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्या आजोबांनी याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे आणि म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभे ठाकलेले आहोत. आम्ही दोघं मिळून फेकून देणार आहोत. मोदींची शाळा कोणती ? भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. आम्ही मराठी बोलणारे कडवट हिंदू आहोत. देवेंद्र फडणवीस म्हणाले भाषेच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही. न्याय मागण्यासाठी गुंडगिरी केली तर आम्ही गुंड आहोत.
'सात पिढ्या आल्यातरी हिंदी सक्ती होऊ देणार नाही'
जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे बाटगे आहेत. तुम्ही नावाला मराठी आहात. मुंबई आपण लढून घेतली. काश्मीरमधले 370 हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. हिंदीची सक्ती तुमच्या सात पिढ्या आल्यातरी होऊ देत नाही. उद्धव ठाकरे करत होता तेव्हा पडलात का गद्दार करून पडला. मराठी भाषा सक्तीची करावी लागते का ? तोडा, फोडा आणि राज्य करा. आपण सगळे एकत्रच होतो. 2014 नंतर महाराष्ट लचके तोडले. तुम्ही तिथं बसलेल्या मालकांचे बूट चाटण्यासाठी गद्दारी केल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.