Uddhav Thackeray Dharashiv Sabha: ओमराजेंच्या गडात ठाकरेंची तोफ धडाडणार! बंडखोर खासदारांच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांना देणार महत्त्वाचा संदेश

ऑपरेशन टायगर दरम्यान उद्धाव ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा झंझावाती दौरा सुरू आहे.

Uddhav Thackeray Dharashiv Sabha: ओमराजेंच्या गडात ठाकरेंची तोफ धडाडणार! बंडखोर खासदारांच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांना देणार महत्त्वाचा संदेश

उद्धाव ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदारांनी ऑपरेशन टायगर दरम्यान बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. याच पार्श्वभूमिवर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा झंझावाती दौरा सुरू आहे. काल वाशिम-यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे संजय देशमुखांवर कडाडले. आज उद्धव ठाकरेंच्या विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्याचा उद्या दुसरा दिवस आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटी घेत त्यांच्यासोबत थेट संवाद साधणार आहेत.

तसेच परभणीचे फुटीर खासदार संजय बंडु जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. तर सकाळी 10 वाजता अक्षता मंगल कार्यालय परभणी इथे जाहीर सभा होईल त्यानंतर दुपारी 3 वाजता सिद्धार्थ मंगल कार्यालय धाराशिव इथे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडेल. हिंगोली येथे उद्धव ठाकरे यांनी हे ऑपरेशन टायगर नसून हे ऑपरेशन देवेंद्र आहे असे वक्तव्य केल्यानंतर यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा- Chandrashekhar Bawankule : “शेतकऱ्यांच्या हितासाठी बँका पुढे येत नसतील तर…” पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांना बावनकुळेंचा कडक इशारा

ओमराजेंच्या गडात ठाकरेंचा झंझावाती दौरा
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंचे अत्यंत निष्ठावंत मानले जायचे, मात्र शिंदेंच्या ऑपरेशन टायरला त्यांची निष्ठा बळी पडल्याचे पाहायचे मिळाले. पक्षांतर केलेल्या सहा खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश आहे. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात सध्या उद्धव ठाकरे जाहीर सभा धडाडणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने या सभेद्वारे मोठं शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली असून, धाराशिवमध्ये ठाकरे विरुद्ध ओमराजे असा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत.

अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी साथ सोडल्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. दुपारी तीन वाजता शहरातील सिद्धाई मंगल कार्यालयात होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेत ठाकरे ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरावर काय भूमिका मांडतात, कोणते आरोप करतात आणि कार्यकर्त्यांना कोणता संदेश देतात, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number