नाशिक, १४ मे, २०२४, प्रतिनिधी : बुधवारी नाशिकमध्ये दिग्गज नेते सभा घेणार आहेत. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राशपचे शरद पवार, शिउबाठाचे उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभा होणार आहे. पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचारासाठी आता दिग्गज नेते नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत.
राज्यभरात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी, १५ मे रोजी नाशकात सभा होणार आहे. यासोबतच राशपचे शरद पवार, शिउबाठाचे उद्धव ठाकरे यांचीही नाशिक आणि दिंडोरीमध्ये होणार सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव मध्ये, शरद पवार यांची वणी तर उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर सभा होणार आहे.
दिंडोरीत भाजपाच्या भारती पवार, राशपचे भास्कर भगरे आणि वंचित बहुजन आघाडीचे गुलाब बर्डे यांच्यात लढत होणार आहे. तर, नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे शिउबाठाचे राजाभाऊ वाजे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.
चार टप्प्यातील निवडणूका पार पडल्या आहेत. तर, सोमवारी २० मे, २०२४ रोजी राज्यात पाचव्या टप्प्यातले मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचारसभांचा धडाका सुरू आहे.