‘ज्ञानेश कुमार मतांची तर भिमनवार गुणांची चोरी करतात…’; विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी पोहोचून विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला.
‘ज्ञानेश कुमार मतांची तर भिमनवार गुणांची चोरी करतात…’; विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar: पुण्यात विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची धग आता राजकीय पटलावर अधिक तीव्र झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी पोहोचून विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी अत्यंत आक्रमक आणि घणाघाती भाषणात सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून मतांची हेराफेरी केली जात आहे, तर दुसरीकडे एमपीएससीचे अध्यक्ष रजनीश भिमनवार यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची आणि गुणांची चोरी होत आहे, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला.

‘दुष्काळामुळे मेसचे पैसे भरणे कठीण’; विद्यार्थ्यांच्या व्यथांवर सरकारला धारेवर धरले

राज्यातील बिकट परिस्थितीवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मराठवाड्यापासून राज्यभरात भीषण दुष्काळाचे सावट आहे. शेतातील पिके हाताची गेल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, पुण्यात शिकणाऱ्या आपल्या मुलांच्या मेसचे पैसे भरण्याची ताकदही आता पालकांमध्ये उरलेली नाही. या आंदोलनात बसलेल्या उमेदवारांपैकी तब्बल 50 टक्के पेक्षा जास्त मुले 30 वर्षे वयापेक्षा अधिक वयाचे आहेत. आयुष्याची 5 ते 6 वर्षे एका लहानशा खोलीत अत्यंत बिकट परिस्थितीत घालवून अभ्यास करणाऱ्या या गुणवंत तरुणांच्या भविष्याशी हे सरकार खेळत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा –  ‘लाठ्या-काठ्या झेलण्यास मी पुढे…’; पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात संजय राऊत कडाडले

काँग्रेसचा आंदोलनाला पूर्ण पाठिंबा

MPSC परीक्षांमधील पारदर्शकता नष्ट करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचे हक्क हिरवून घेणाऱ्या या प्रशासनाला आणि सरकारला योग्य ती जागा दाखवून दिल्याशिवाय शांत बसू नका, असा थेट सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली कारभार सुरू असून, गुणवत्तेच्या जोरावर आपले हक्क मागणाऱ्या तरुणांवर हा मोठा अन्याय आहे. काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासन त्यांनी शेवटी दिले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version