Vijay Wadettiwar VS BJP : ‘भाजपाचे 100हून अधिक नगरसेवक आमच्या संपर्कात’ वडेट्टीवारांचा मोठा दावा; राजकीय घडामोडींनाही वेग

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील शिंदेवाहीच्या नगराध्यक्षासह काही नगरसेवक नॅाटरीचेबल असल्याची माहिती समोर आली. यानंतर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Vijay Wadettiwar VS BJP : ‘भाजपाचे 100हून अधिक नगरसेवक आमच्या संपर्कात’ वडेट्टीवारांचा मोठा दावा; राजकीय घडामोडींनाही वेग

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील शिंदेवाहीच्या नगराध्यक्षासह काही नगरसेवक नॅाटरीचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. अशातच आगामी विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील काँग्रेसचे काही मतदार आतापासूनच नॅाटरिचेबल झाले आहेत.

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस 70  पेक्षा जास्त नगरसेवकांना भाजपने अज्ञातस्थळी नेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान काँग्रेसचे नगरसेवक भाजप नेते आमदार बंटी भांगडीया यांच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना हा मोठा धक्का बसणार आहे. यानंतर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपचे तब्बल 100 पेक्षा जास्त नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. 

हेही वाचा- Vidhan Parishad Election 2026 : फॉर्म्युला ठरला! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पाहा कुणाला किती जागा ?
विजय वडेट्टीवार म्हणाले की, “काँग्रेस पक्षाचा उमेदवार अजून ठरलेला नाही, आज तीन वाजता झूम मीटिंग आहे, महाविकास आघाडीत कोणती जागा कोणाला सोडायची यावर आज चर्चा करू… आमच्याही संपर्कात भाजपचे 100 पेक्षा जास्त नगरसेवक आहेत, त्यांच्यातही प्रचंड वाद आहेत, दुसरा गट आम्हाला मदत करायला तयार आहे पण आम्ही त्यात भानगडीत पडत नाही, जो घोडेबाजार चालले आणि तो उत्सव चाललेला आहे… आताच्या माझ्या माहितीप्रमाणे नगरसेवकांना पाच-पाच लाख रुपये देऊन उचलण्याचे काम सुरू आहे, या ज्या काही सवयी 2014 पासून सर्वांनाच लावली आहे यातून फेयर निवडणूक होण्याची शक्यता नाही, योग्य माणसाची निवड होणे, यात पैसा कोणकोणता होतो, मोठमोठे उद्योगपती येतील, राजकारण, समाजसेवा ही काही प्रामाणिक माणसांची राहिलेली नाही…  उद्योगपती, ठेकेदार, मोठमोठे कंत्राटदार हे आता भविष्यातील त्या विधान परिषदेत येणाऱ्या काळात हे चेहरे दिसतील म्हणजे सामान्य माणूस कुठेही दिसणार नाही अशा प्रकारची परिस्थिती भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल…”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number