Vinayak Raut : विनायक राऊत यांना कधीही अटक होण्याची शक्यता; तपासातील नव्या घडामोडींनी राजकीय वर्तुळात खळबळ

विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या तक्रारीनंतर माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Vinayak Raut : विनायक राऊत यांना कधीही अटक होण्याची शक्यता; तपासातील नव्या घडामोडींनी राजकीय वर्तुळात खळबळ

माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या तक्रारीवरून विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर न्यायालयाकडून संरक्षण नसल्याचे समोर आले आहे.

यावेळी अटकपूर्व जामीनावर मुख्य सुनावणी 23 जुलै ला होणार असून 23 तारखेपर्यंत विनायक राऊत यांना न्यायालयाने कोणतेही अंतरिम संरक्षण दिलेले नाही. दरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलिस विनायक राऊत यांना कधीही ताब्यात घेऊ शकतात. न्यायालयाने अंतरिम संरक्षण नाकारल्याने 23 जुलैच्या सुनावणीपूर्वी कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा- Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक; तब्बल 8.5 किलो वजन घटलं, न्यायालयाची केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस

नेमकं प्रकरण काय?
शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत राऊत यांच्यासह कुटुंबावर अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत कुटुंबाकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर घरात बळजबरीने गोमूत्र प्यायला दिले गेले, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.

या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच काळी जादू प्रतिबंधक कायद्यासह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. यानंतर विनायक राऊत, गितेश राऊत याच्यासह तब्बल 7 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तपास सुरू असून संबंधित सर्व आरोपांची पडताळणी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number