शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमध्ये पाच जागांसाठी आज मतदान; 182 उमेदवार रिंगणार, कोण बाजी मारणार?

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर 5 मतदारसंघासाठी 182 उमेदवारांकरता आज मतदान होत आहे.

शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमध्ये पाच जागांसाठी आज मतदान; 182 उमेदवार रिंगणार, कोण बाजी मारणार?
Teacher Graduate Election 2026

विजय चिडे, तेजस होमतुरे, सुरेंद्र आकोडे / प्रतिनिधी 

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. 182 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर(मराठवाडा), पुणे या मतदारसंघात जोरदार चुरस दिसली. अनेक ठिकाणी बंडखोरांनी आणि अपक्षांनी मोठे आव्हान उभे केले आहे. तर काही प्रस्थापितांच्या सत्तेला सुरूंग लागण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचवेळी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

आज शुक्रवारी, 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात होईल. तर सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सर्व उपविभागीय अधिकारी स्तरावरून मतदान पथकांना निवडणुकीसाठी आवश्यक साहित्य देण्यात आले आहे. सर्व पात्र पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मतपात्रिका वैध ठरावी, या उद्देशाने निवडणूक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर मराठवाडा मतदारसंघाच्या
निवडणुकीमध्ये प्रथमच ‘पवार विरुद्ध पवार’ सामना रंगणार

महायुतीत भाजपची माघार, महाविकास आघाडीत उद्धवसेनेचे बंड

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ प्रतापसिंह पाटील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांच्यात थेट लढत

उबाठाचे दिलीप घुगे ही निवडणूक रिंगणात

सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत विभागातील ८४२ केंद्रांवर मतदान

३.२६ लाख मतदार ४१ उमेदवारांतून आज ‘पदवीधर’चा आमदार निवडणार

छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

यंदा निवडणुकीच्या रिंगणात ४१ उमेदवार असून, विभागातील तब्बल ३ लाख २६ हजार ७०९ पदवीधर मतदार उमेदवारांचे भवितव्य निश्चित करतील.

मतदान प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखावा, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
******************

नागपूर

– नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज, सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

– निवडणुकीच्या रिंगणात ३८ उमेदवार असून, २ लाख ५५ हजार ६०३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार.

– काँग्रेसचे अभिजित वंजारी, भाजपचे सुधाकर कोहळे आणि नितेश कराळे यांच्यात प्रमुख तिरंगी लढत होणार आहे.

– विभागातील सहा जिल्ह्यांत ४४५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली.

– निवडणुकीसाठी २ हजार ५३५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

– शांततेत मतदान पार पडावे, यासाठी प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
************************

अमरावती विभाग शिक्षक निवडणूक:

अमरावती शिक्षक मतदारसंघ महायुतीतून
शिवसेना शिंदे गटाचे
विद्यमान आमदार किरण सरनाईक हे उमेदवार आहे

महायुतीतील ४ उमेदवार बंडखोरीवर कायम आहेत. तीन बंडखोर भाजपचे एक शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार

महायुतीतील या ४ उमेदवार बंडखोरी –
१. संगीता सचिन्द्र शिंदे-बोडे (भाजप खासदार अनिल बंडे यांच्या भगिनी)

२. शेखर भोयर (भाजप, आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे.)

३. श्रीकांत देशपांडे माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी

४. सुमित पवार, भाजप पदाधिकारी

महाविकास आघाडीचे उमेदवार-
१. अदिती ऋषिकेश पोहरे (काँग्रेस)
२. दत्तात्रय लहाने (उद्धव ठाकरे गट)

दिलीप कडू हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत.
एकूण मतदार 35810
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ८१ मतदान केंद्रांवर २४ हजार ७३२ पुरुष तर ११ हजार ७८ महिला असे एकूण
३५ हजार ८१०शिक्षक मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकुण मतदारांची संख्या ३५ हजार ८१०

जिल्हानिहाय एकुण मतदारांची संख्या :

अमरावती – १०,०९७,
अकोला – ५,९४२,
बुलढाणा – ९,१२४,
वाशिम – ३,७१५
यवतमाळ – ६,९३२
अशी मतदारांची संख्या आहे.
तर सर्वाधिक मतदान अमरावती जिल्ह्यात

जिल्हानिहाय एकुण मतदान केंद्रांची संख्या:
अमरावती – २५,
अकोला – १३,
बुलढाणा – १८,
वाशिम – ७
यवतमाळ – १८
अमरावती शिक्षक मतदारसंघ विभागात
एकूण ८१ केंद्र

एकूण जिल्हे पाच
अमरावती, अकोला, बुलढाणा ,वाशिम, यवतमाळ,

अमरावती शिक्षक मतदार संघ भाजपच्या बंडखोर उमेदवार तथा भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे यांनी घेतला खासदार अनिल बोंडे भावाचा आशीर्वाद मला माझ्या भावांना विजयी हो असा आशीर्वाद दिला संगीता शिंदे यांची प्रतिक्रिया

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number