Wednesday, May 21, 2025 01:23:46 PM

भारत-पाक युद्धाशी आमचा संबंध नाही; अमेरिकेचे उपराष्ट्रध्यक्ष जे.डी.व्हान्स यांचं वक्तव्य

काही देश भारताला पाठिंबा देत आहेत तर काही देश पाकिस्तानला खुलेआम पाठिंबा देत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे.

भारत-पाक युद्धाशी आमचा संबंध नाही अमेरिकेचे उपराष्ट्रध्यक्ष जेडीव्हान्स यांचं वक्तव्य

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत काही दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना भारतीय हवाई दलाने उद्ध्वस्त केले. सध्या, भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असल्यामुळे एकीकडे काही देश भारताला पाठिंबा देत आहेत तर दुसरीकडे काही देश पाकिस्तानला खुलेआम पाठिंबा देत आहेत. मात्र अशा परिस्थितीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

नेमकं काय म्हणाले अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष?

'अमेरिका भारत आणि पाकिस्तानवर नियंत्रण ठेवू शकत नाही. आम्ही कोणत्याही युद्धात सहभागी होणार नाही, ते आमचे काम नाही. पण दोन्ही अणुशक्ती असणार्‍या देशांमधील तणाव कमी करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो', असे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी स्पष्टीकरण दिले.

भारत आणि पाकिस्तान युद्ध मोठ्या संघर्षाला जन्म देऊ शकतात:

भारत आणि पाकिस्तान हे दोन अणुशक्तीशाली देश आहेत. हे देश मोठ्या संघर्षाला जन्म देऊ शकतात. ट्रम्प प्रशासन भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य अणुयुद्धाबाबत चिंतीत आहे. तणाव लवकरात लवकर कमी व्हावा, अशी अमेरिका इच्छा व्यक्त करत आहे, असे एका मुलाखतीत व्हान्स म्हणाले.

आम्ही युद्धात सहभागी होणार नाही:

'पाकिस्तानबद्दल भारताला काही तक्रारी आहेत. आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो, मात्र आम्ही भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी होणार नाही. हे आमचं काम मुळीच नाही. अमेरिकेला युद्ध नियंत्रित करण्याच्या क्षमतेची चिंता नाही. मात्र, आम्ही दोन्ही देशांना शस्त्र खाली ठेवण्यास सांगू शकत नाही. पण आम्ही राजनैतिक माध्यमांचा वापर करत राहू. दोन्ही देशांमधील प्रादेशिक संघर्षाचे रूपांतर अणुयुद्धात होऊ नये. जर तसे झाले तर, त्याचे परिणाम अत्यंत विनाशकारी होतील. मात्र, असे काहीही होणार नाही अशी आशा व्यक्त करतो', असे जेडी व्हान्स म्हणाले.

ट्रम्प यांचा पाकिस्तानला दम:

एकाच दिवसात वायू, जल आणि जमीन अशा तिहेरी मार्गाने भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्याचा बळी ठरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मुस्लिम राष्ट्रांकडे दयेची भीक मागण्यास सुरूवात केली आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर देत म्हटले की, 'युद्ध तातडीने थांबवा आणि भारतासोबत चर्चा करण्यासाठी तयार राहा'.


सम्बन्धित सामग्री