Sunday, July 13, 2025 09:25:22 AM

5 तारखेआधी हिंदी सक्ती मागे घेतल्यास जल्लोष करू; मनसे नेते यशवंत किल्लेदारांची माहिती

पाच तारखेआधी हिंदी सक्ती मागे घेतल्यास जल्लोष करु. 5 तारखेला आम्ही विजयी मोर्चा काढू अशी माहिती मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली.

5 तारखेआधी हिंदी सक्ती मागे घेतल्यास जल्लोष करू मनसे नेते यशवंत किल्लेदारांची माहिती

मुंबई: पाच तारखेआधी हिंदी सक्ती मागे घेतल्यास जल्लोष करु. 5 तारखेला आम्ही विजयी मोर्चा काढू अशी माहिती मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली. सरकारने पहिलीपासून मुलांना शाळेत हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती केल्याने मनसे आक्रमक झाली आहे. त्यामुळे हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसे मुंबईत मोर्चा काढणार आहे.  

"आम्ही अनेक पोस्टर लावले आहेत आणि लावणार आहोत. समाजातले विविध घटक आहेत, जे सकारात्मक भूमिका देत आहेत. राज ठाकरेंनी गेली दोन अडीच महिने ही भूमिका घेतली आहे. अशोक उईके यांनी देखील मराठी भाषेविषयी सकारात्मक भूमिका घेतली आहे. जरी भाजप मंत्री असतील तरी त्यांचं अंतरमन आमच्या सोबत आहे. जे सकारात्मक प्रतिकिया देतील त्यांचे बॅनर आम्ही लावू" असे मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा: गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 18 संचालक पदासाठी आज मतदान

पुढे ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रभर या बैठका घेत आहोत. कोणत्या सूचना करायच्या जेणे करून जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील यावर चर्चा होईल. येत्या 4 दिवसात जास्तीत जास्त लोकं कशी येतील यावर चर्चा होईल असेही त्यांनी सांगितले.मोर्च्याबद्दल लोकांमध्ये जागृती झाली आहे. सरकारपर्यंत हे गेलं आहे. अधिवेशनात देखील गदारोळ होईल. जर निर्णय मागे घेतला तर पण विजयी मोर्चा काढू असे किल्लेदार यांनी म्हटले आहे. 

निवडणूकीसाठी जो फंड लागतो, त्यासाठीच महापालिकेला लुटायचा हा एक भाग आहे. समजा पाच तारखेआधी सरकारने हिंदी सक्ती विरोधात निर्णय बदलला तर आम्ही पाच तारखेलाच जल्लोष मोर्चा करू अशी घोषणा मनसेच्या यशवंत किल्लेदार यांनी केली. 


सम्बन्धित सामग्री