मुंबई: ठाकरे युतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. 'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. इंजिन आणि मशाल यांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार. तुम्ही आणि मी विचार करून काय उपयोग?', अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा: 'भोंगा वाजवणाऱ्यांनी प्रस्ताव द्यावा'; संदीप देशपांडेंचा राऊतांना टोला
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?
'राज ठाकरे साहेब मनसेचे प्रमुख आहे. उद्धव ठाकरे उबाठाचे प्रमुख आहेत. आहेत ना? इंजिन आणि मशाल या दोघांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही आणि मी विचार करून काय उपयोग?', असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.