Thursday, July 17, 2025 02:05:47 AM

दिशा सालियान प्रकरणावर काय म्हणाले महायुतीचे नेते?

दिशा सालियान प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. यावर महायुतीच्या नेत्यांनी भाष्य केले आहे.

दिशा सालियान प्रकरणावर काय म्हणाले महायुतीचे नेते

मुंबई: दिशा सालियान हिचा मृत्यू होण्याआधी तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही असा दावा मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून केला. दिशा हिची हत्या आणि आदित्य ठाकरे यांचा हत्येशी संबंध असल्याच्या पुरावे नाहीत असेही पोलिसांनी प्रतिज्ञापज्ञात स्पष्ट केले. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. यावर महायुतीच्या नेत्यांनी भाष्य केले आहे. 

दिशा सालियान प्रकरणावर महायुतीचे नेते काय म्हणाले?

दिशा सालियानच्या वडिलांनी स्वत: आदित्य ठाकरेंवर आरोप केला. दिशाच्या वडिलांचा पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप आहे. 16 तारखेला अंतिम निर्णय येईल. पिक्चर अभी बाकी हैं  असे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच तपास यंत्रणांना तपास करु द्या. एसआयटीचा अंतिम निर्णय आल्यावर बोलू अशी प्रतिक्रिया दिशा सालियान प्रकरणावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. नव्याने तपासणी करण्याची मागणी  दिशाच्या वडिलांनी केली आहे. नव्याने तपासणी केल्यास सत्य समोर येईल असे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. तर न्यायालय याप्रकरणी निर्णय देईल असे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले. 

हेही वाचा :'शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न'

दिशा सालियान प्रकरणावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिक्रिया

दिशा सालियान प्रकरणात गेले पाच वर्ष माझ्या बदनामीचा प्रयत्न झाला असल्याचे आदित्य यांनी म्हटले आहे. ज्या प्रकरणाशी संबंध नाही त्या विषयी बोलणार नाही असेही त्यांनी सांगितले. दिशा सालियान प्रकरणावर राऊतांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस, एसआयटी आमची नाही. आता फडणवीसांनी माफी मागावी असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपा नेते ठाकरे कुटुंबाला अडकवत होते. भाजपा हा खोटारडा पक्ष आहे अशी  प्रतिक्रिया दिशा सालियन प्रकरणी पटोलेंनी दिली आहे. तर सरकारने ठाकरे कुटुंबाची आणि जनतेची माफी मागावी, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. 


सम्बन्धित सामग्री