मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भगिनी जैजयवंती यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आले आहे. या लग्नसोहळ्यानिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहे.
राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी आज दोघे भाऊ पुन्हा एकत्र आले आहेत. दादर येथील राजे शिवाजी महाराज विद्यालय येथे पार पडणाऱ्या या लग्न सोहळ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी आज दोघे भाऊ पुन्हा एकत्र आले आहे. दादर येथील राजे शिवाजी महाराज विद्यालय येथे पार पडणाऱ्या या लग्न सोहळ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी देखील अनेक कौटुंबिक सोहळ्यात ठाकरे कुटुंब एकत्र आले होते.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
विधानसभा निवडणुकीत एकीकडे महायुतीला घवघवीत यश मिळाले असताना दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्रितपणे 288पैकी 50 जागांचाही आकडा गाठू शकली नाही. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केवळ 20 जागांवरच समाधान मानावे लागले. गेल्या काही निवडणुकांचा विचार करता ही ठाकरे गटाची नीचांकी ठरली आहे. याशिवाय भाजपाचा पाठिंबा असतानाही मनसेचा तर या निवडणुकीत धुव्वा उडाला. त्यामुळे या निवडणुकीनंतर दोघे भाऊ एकत्र येतील अशी चर्चा रंगली होती.
हेही वाचा : 'मराठी माणसा आता तरी जागा हो'