नागपूर : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल सर्वांकडून त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होत आहे. अशातच आता ठाकरे सेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते. दरम्यान आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. दोघांनीही आता एकत्र काम करायला हवं अशी प्रतिक्रिया जय महाराष्ट्रशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ठाकरे सेनेच्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र काम करायला हवे असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांणा उधाण आले आहे.
उद्धव ठाकरे - फडणवीसांच्या भेटीत काय चर्चा झाली?
राज्यात फडणवीस सरकार स्थापन झाले असून हिवाळी अधिवेशन सुरूवात झाली आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना पुष्पगुच्छ देत त्यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. विधानसभा निकालानंतर त्यांची ही पहिलीच भेट आहे. दोघांच्या भेटीत काय चर्चा झाली? यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.