मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. गेल्या महिन्याभरात ही फडणवीस यांची आदित्य ठाकरे यांच्यासोबतची तिसरी भेट होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मागील सरकारच्या काळात आदित्य ठाकरे यांनी ना मुख्यमंत्री शिंदे, ना उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे या नव्या भेटीमागे नेमके काय दडलंय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
विकास कामांसाठी भेटलोय - आदित्य ठाकरे
आमदार आदित्य ठाकरे यांनी या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, "जनतेच्या विकासकामांसाठी आम्ही विरोधक आणि सत्ताधारी एकत्र काम करायला हवे. जनतेच्या कामांसाठी आम्ही तयार आहोत." असे स्पष्ट प्रतिक्रिया ठाकरे यांनी माध्यमांना दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रशंसा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची उद्धव ठाकरे यांनी सामनातून तोंडभरून स्तुती केली होती. मुख्यमंत्र्यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी गडचिरोली दौरा केला होता, त्याबाबत कौतुकाचा अग्रलेखही लिहिला होता. याशिवाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील फडणवीस यांचे कौतुक केले होते.
पालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू
पुढील काही महिन्यांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहिर होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई आणि ठाणे पालिकेत महायुतीला, विशेषतः भाजपाला, एकहाती सत्ता मिळवायची आहे. यासाठी भाजपाने मनसेसह इतर पक्षांशी चर्चेची सुरुवात केली आहे. भाजपाचा 'काँग्रेसमुक्त' नारा कायम आहे, मात्र भविष्यात भाजपाने ठाकरे गटासोबत मैत्रिपूर्ण लढत लढल्यास आश्चर्य वाटायला नको.
👉👉 हे देखील वाचा : संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत एकही व्यक्ती एक इंचही मागे हटणार नाही.
महत्वाचे मुद्दे:
ठाकरे गटाची मुख्यमंत्र्यांशी जवळीक
सत्ताधारी आणि विरोधक एकत्र काम करण्याचा सूर
पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटींचे राजकीय महत्त्व
उद्धव आणि आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक
ठाकरे गटाचा मुख्यमंत्रीविरोध मावळला
ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.