MNS Gudhi Padwa Melava 2026: ‘भाषेची आणि मुलांचीही हमी नाही, हे कोणतं राज्य?’; राज ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

राज ठाकरे यांनी राज्यातील शाळा-कॉलेजेसमध्ये पोहोचलेल्या अमली पदार्थांच्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात आज ड्रग्ज विकले जात आहेत.

MNS Gudhi Padwa Melava 2026: ‘भाषेची आणि मुलांचीही हमी नाही, हे कोणतं राज्य?’; राज ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

MNS Gudhi Padwa Melava 2026: ‘तुमच्या भाषेची हमी नाही, तुमची स्वतःची हमी नाही आणि तुमच्या पोटच्या पोराबाळांचीही हमी नाही. कशाचीच खात्री नसलेलं हे कोणतं राज्य म्हणायचं?’ अशा संतप्त शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला. “आम्ही शिवरायांच्या राज्यात राहतो असं अभिमानाने सांगतो, पण आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते, तर त्यांनी अशा घटनांवर विधानसभेत जाऊन संबंधितांना कापून काढले असते,” असे सांगत त्यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला.

राज्यात अंमली पदार्थांचा विळखा आणि मुलांच्या अपहरणाचे सत्र
राज ठाकरे यांनी राज्यातील शाळा-कॉलेजेसमध्ये पोहोचलेल्या अमली पदार्थांच्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात आज ड्रग्ज विकले जात आहेत. ग्रामीण भागातून शहरात आलेली तरुण मुलं-मुली या विळख्यात अडकत आहेत. केवळ ड्रग्जच नाही, तर लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर या 36 दिवसांच्या कालावधीत केवळ मुंबईत 82 मुले बेपत्ता झाली आहेत. तसेच, जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या काळात नवी मुंबईतून 499 मुलांच्या अपहरणाच्या घटनांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी राज्याच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

NCRB आणि विधानसभेतील आकडेवारी; साडेपाच हजार मुले बेपत्ता
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या आकडेवारीचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी वास्तव मांडले. महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 4,500 ते 5,500 मुले बेपत्ता होतात. 2022 मध्ये हा आकडा 4,619 इतका होता, ज्यामध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबई हे सर्वाधिक बाधित शहर असून, येथे दरवर्षी 2,000 हून अधिक मुले बेपत्ता होण्याच्या घटना घडतात. “एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुले गायब होत असताना त्यांच्या आई-वडिलांच्या मनावर काय बीत असेल?” असा हृदयद्रावक सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – Raj Thackeray : ‘ते इन्स्टाग्राम बघणं बंद करा…’, राज ठाकरेंचा थेट सोशल मिडियावरच हल्लाबोल, पण का?

इंस्टाग्रामचा आभासी विळखा
या सर्व गंभीर समस्यांकडे जनतेचे दुर्लक्ष का होत आहे, याचे कारण सांगताना राज ठाकरेंनी तरुण पिढीला आरसा दाखवला. “आम्ही आमची ओळख विसरून गेलो आहोत कारण आम्ही ‘इंस्टाग्राम’मध्ये गुंतलो आहोत. जोपर्यंत राज ठाकरे आकडे सांगत नाहीत, तोपर्यंत आम्हाला काहीच कळत नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तरुणांनी मोबाईलच्या आभासी दुनियेतून बाहेर पडून आपल्या संस्कृतीसाठी, भाषेसाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी जागे होण्याची वेळ आली आहे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number