NCP Meeting In Delhi: राज्यात काँग्रेसची मनधरणी, तर दिल्लीत राष्ट्रवादीची खलबतं; खासदार सुनील तटकरेंच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी पक्षाची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.

NCP Meeting In Delhi: राज्यात काँग्रेसची मनधरणी, तर दिल्लीत राष्ट्रवादीची खलबतं; खासदार सुनील तटकरेंच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

NCP Meeting In Delhi: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बारामती पोटनिवडणुक बिनविरोध करण्यावरून पेच सुरू असतानाच, देशाच्या राजधानीत मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी पक्षाची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक पार पडत असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सुनील तटकरेंच्या निवासस्थानी बड्या नेत्यांची उपस्थिती
खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. बारामती पोटनिवडणुक बिनविरोध करणे, हे या बैठकीचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं जात आहे. 

हेही वाचा – Parth Pawar Oath Ceremony: गुलाबी जॅकेट अन् तीच लय…अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ

या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते बारामती पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ही दिल्लीतील बैठक आता निर्णायक वळणावर आली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number