Devendra Fadnavis: फडणवीस दिल्लीला जाणार का? संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ भाकितावर मुख्यमंत्र्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेऊन पुण्याहून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Devendra Fadnavis: फडणवीस दिल्लीला जाणार का? संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ भाकितावर मुख्यमंत्र्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis: शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचे भाकीत वर्तवल्यामुळे राजकीय क्षेत्रात नव्या चर्चांना उधाण आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेऊन पुण्याहून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना आगामी 'दिल्ली दौऱ्याबद्दल' थेट प्रश्न विचारला असता, फडणवीसांनी हसत, ;परवाच तर मी दिल्लीला जाऊन आलो,' असे अत्यंत मिश्किल उत्तर देत मूळ प्रश्नाला बगल दिली.

केंद्रात मंत्रिपद आणि राज्यात नेतृत्वाची भाकिते
पावसाळी अधिवेशनादरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचे हे अखेरचे अधिवेशन असू शकते, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, फडणवीस यांना लवकरच केंद्रीय मंत्रिपदाची मोठी जबाबदारी देऊन दिल्लीत बोलावले जाईल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवली जाईल. विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या या दाव्यांमुळे फडणवीस यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

हेही वाचा – Supriya Sule Nashik: खरातवर टीका, फडणवीसांचं कौतुक; NDAसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या…

अमित शाह यांच्यासोबत 45 मिनिटे खलबते; चर्चांना आले बळ
गेल्या काही काळापासून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याने या चर्चांना अधिक बळ मिळत आहे. विशेषतः मागील आठवड्यात नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात 1 महत्त्वाची बैठक पार पडली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळपास 45 मिनिटे चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर नागपुरातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी आगामी अधिवेशनातील रणनीती, पुण्याची मोशी दुर्घटना आणि आषाढी वारीच्या नियोजनासोबतच या राजकीय चर्चांवरही आपली भूमिका स्पष्ट केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number