Municipal Election 2026 : महापालिकेच्या निवडणुकीत घराणेशाहीचे वारे; निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्था आणि नाराजी

राज्यात बृहन्मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना, महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाचा गोंधळ, निष्ठावंतांचे नाराजीनाट्य, आरोप-प्रत्यारोप अशा अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.

Municipal Election 2026 : महापालिकेच्या निवडणुकीत घराणेशाहीचे वारे; निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्था आणि नाराजी

राज्यात बृहन्मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना, महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाचा गोंधळ, निष्ठावंतांचे नाराजीनाट्य, आरोप-प्रत्यारोप अशा अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. असं असताना आणखी एका गोष्टीसाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे ती म्हणजे, 'घराणेशाही'चे वर्चस्वाचे. राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताच राजकीय पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. अनेक महानगरपालिकांमध्ये बड्या नेत्यांनी आपल्याच नातेवाईकांची जागा फिक्स केल्यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी निष्ठावान असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 

यामध्ये सर्वपक्षामधून नावे पुढील प्रमाणे ;
भाजपमधून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वाहिनी हर्षित नार्वेकर कुलाबा प्रभाग क्रमांक २२७ मधून आणि भाऊ मकरंद नार्वेकर हे प्रभाग क्रमांक २२६ मधून  निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच नाशिकमधून सीमा हिरे यांची मुलगी रश्मी हिरे निवडणुकांच्या रिंगणात उतरली आहे.

तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभु हे मुंबईसाठी प्रभाग क्र. ५४ मधून आणि विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत प्रभाग क्रमांक 89 मधून निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. पुढे शिवसेना एकनाथ शिंदे गटातून छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट आणि मुलगी हर्षिता शिरसाट यांच्यासह सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया गुरव हिला प्रभाग क्रमांक 191 मधून तर मुलगा समाधान सरवणकर यांना प्रभाग क्रमांक 194 येथून आणि रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर यांना प्रभाग क्रमांक ७३ मध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. 

तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटातून नवाब मलिक यांचा भाऊ कप्तान मलिक, बहीण सईदा खान आणि सून बुरशा मलिक यांच्यासह अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कॉंग्रेस पक्षातून अस्लम शेख यांचा मुलगा हैदर शेख यांना प्रभाग क्रमांक 34 मधून आणि बहीण कमर जहाँ सिद्दीकी या प्रभाग क्रमांक ३३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी, मुंबईसह इतर महानगरपालिकांमध्ये कौटुंबिक संबंधांवर आधारित निवडणूक तिकिटांचे वाटप बरेच व्यापक झाले असून घराणेशाहीच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number