Bihar Assembly Election 2025 : महिला ठरल्या ‘किंगमेकर!’; ज्यांना मतदान करतील तेच स्थापन करतायेत सत्ता, बिहार निवडणुकीतही तेच चित्र

भारताच्या निवडणुकांमध्ये महिला मतदार निर्णायक शक्ती बनल्या आहेत. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड पासून बिहारपर्यंत महिलांच्या मतदानाने राजकीय समीकरणे बदलली.

Bihar Assembly Election 2025 : महिला ठरल्या ‘किंगमेकर!’; ज्यांना मतदान करतील तेच स्थापन करतायेत सत्ता, बिहार निवडणुकीतही तेच चित्र

भारताच्या लोकशाहीला बळकटी देण्यात महिला मतदार आता सर्वात प्रभावी आधारस्तंभ म्हणून पुढे येत आहेत. मागील काही वर्षांत झालेल्या विधानसभा निवडणुकांत महिलांची मतदानातील भूमिका केवळ निर्णायक ठरलेली नाही, तर अनेक राज्यांचे राजकीय समीकरणच बदलून टाकणारी ठरली आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड ते अलीकडील बिहार विधानसभा निवडणुकीपर्यंत महिलांच्या ऐतिहासिक सहभागाने स्पष्ट दाखवून दिले की, महिला मतदार ज्या पक्षाच्या बाजूने उभ्या राहिल्या, सत्तेच्या समीकरणाचे गणित त्यांच्या बाजूने फिरले आहे.

महिलांनी आपला सक्रिय सहभाग दाखवत लोकशाही अधिक मजबूत केली आहे. 2023 मध्ये मध्यप्रदेशात महिलांचे मतदान 76 टक्क्यांवर पोहोचले. राज्यातील “लाडकी बहीण” योजनेअंतर्गत मिळालेल्या आर्थिक मदतीने महिलांचा विश्वास वाढला आणि त्याचा थेट परिणाम BJP च्या 163 जागांच्या विजयात दिसला. विश्लेषकांच्या मते, महिलांच्या मोठ्या लाटेने भाजपची राष्ट्रीय रणनीती आकारास आली. हा ट्रेंड 2024 मधील महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड निवडणुकांतही ठळकपणे दिसला. महाराष्ट्रात महिलांचे मतदान 65.22 टक्क्यांवर गेले.

हेही वाचा: Mahua Election Result 2025: महुआ मतदारसंघाचा निकाल जाहीर; तेज प्रताप यादव यांचा 'इतक्या' मतांनी पराभव

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” (CM Majhi Ladki Bahin) योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक आर्थिक मदतीमुळे 2.3 कोटी महिला मतदारांनी मतदान केंद्राकडे मोठ्या संख्येने धाव घेतली. यामुळे महायुतीला 230 जागांचा विक्रमी विजय मिळाला. महिलांनी जात धर्माच्या पलिकडे जाऊन थेट कल्याणकारी योजनांच्या आधारे मत दिले. हरियाण्यात महिलांच्या वाढत्या सहभागाने सलग तिसऱ्यांदा BJP ची सत्ता परतली, तर झारखंडमध्ये “मैया योजना” महिलांपर्यंत पोहोचल्याने हेमंत सोरेन यांचे सरकार पुन्हा सत्तेत परतले.

बिहार निवडणूक 2025

बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये महिला मतदारांनी नवीन विक्रम प्रस्थापित केला. महिला मतदान 71.6 टक्क्यांपर्यंत गेले, जे पुरुषांच्या 62.8 टक्क्यांपेक्षा तब्बल 8.8 टक्क्यांनी जास्त आहे. या प्रचंड सहभागाने 2015 चा विक्रम मोडला. परिणामी, नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA ने 200 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत सत्ता मिळवली. महिलांच्या खात्यात थेट 10,000 रुपये जमा करणाऱ्या योजनांनी महिला मतदार निर्णायकपणे NDA कडे वळल्या. त्यासोबतच विकासकामे आणि दारूबंदी हेसुद्धा महिलांच्या मतदानवाढीमागचे महत्त्वाचे घटक ठरले.

अनेक निवडणुका सिद्ध करतात की महिला मतदार आता केवळ साइलेंट वोटर नाहीत, तर प्रत्यक्षात सत्तेचा निर्णायक आधार बनल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकांतही महिलांच्या वाढत्या सहभागामुळे राष्ट्रीय ट्रेंड स्पष्ट झाला आहे. राजकीय पक्षांना आता महिलांच्या मतांचे महत्त्व नीट कळले आहे. म्हणूनच, भविष्यात महिला सक्षमीकरणाच्या आणखी योजनांवर भर दिला जाणार हे निश्चित.

हेही वाचा: IAF Plane Crash in Chennai: चेन्नईत भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले; पायलट थोडक्यात बचावला

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number