Ashadhi Wari 2026: 150 घनफूट सागवान अन् 250 किलो चांदी… संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी प्रथमच नव्या रथाची निर्मिती

यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी प्रथमच एका नव्या आणि भव्य रथाची निर्मिती करण्यात येत आहे.

Ashadhi Wari 2026: 150 घनफूट सागवान अन् 250 किलो चांदी… संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी प्रथमच नव्या रथाची निर्मिती

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू नगरीत सध्या उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण आहे. यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी प्रथमच एका नव्या आणि भव्य रथाची निर्मिती करण्यात येत आहे. हा नयनरम्य रथ आता श्री क्षेत्र देहू नगरीत दाखल झाला असून, वारकरी आणि भाविकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Amarnath Yatra 2026: ‘या’ तारखेपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा; नोंदणी प्रक्रियेसह जाणून घ्या संपूर्ण नियमावली

राजस्थानच्या सिहोरमध्ये कोरीव काम; 150 घनफूट सागवानाचा वापर
या विशेष रथाची मूळ रचना आणि लाकडावरील कोरीव काम राजस्थानमधील सिहोर येथे अत्यंत कौशल्याने पूर्ण करण्यात आले आहे. रथाच्या निर्मितीसाठी तब्बल 150 घनफूट उच्च दर्जाच्या सागवान लाकडाचा वापर करण्यात आला असून, त्यावर अत्यंत देखणे आणि आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे. राजस्थानहून हा रथ देहूत आणल्यानंतर आता पुढील प्रक्रियेला वेग आला आहे.

250 किलो चांदीने मढवला जाणार रथ; 7 जुलैपूर्वी काम पूर्ण करण्याचा संकल्प
हा रथ अधिक वैभवशाली आणि देखणा दिसावा यासाठी त्यावर चांदीचे नक्षीकाम केले जात आहे. संस्थानकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण रथासाठी सुमारे 250 किलो चांदीचा वापर केला जाणार आहे. येत्या 7 जुलै रोजी होणाऱ्या पालखीच्या मुख्य प्रस्थान सोहळ्यापूर्वी चांदीचे हे सर्व क्लिष्ट आणि कलाकुसरीचे काम पूर्ण करण्याचा मुख्य मानस संत तुकाराम महाराज संस्थानचा आहे. या नव्या रथाच्या वैभवातून यंदाचा पालखी सोहळा अधिक सुवर्णमयी आणि अविस्मरणीय ठरणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number