Anganewadi Jatra 2026 : भाविकांसाठी आनंदाची बातमी, मालवणच्या भराडी देवीचा यात्रेला कौल

कोकणातील या विशेष यात्रेसाठी वाहतूक, सुरक्षा आणि सुविधांची मोठी तयारी सुरू असून लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत.

Anganewadi Jatra 2026 : भाविकांसाठी आनंदाची बातमी, मालवणच्या भराडी देवीचा यात्रेला कौल

कोकणातील सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या आंगणेवाडीतील श्री देवी भराडी यात्रेची तारीख अखेर ठरली असून, यंदाचा उत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील लाखो भाविकांच्या प्रतिक्षेत असलेली ही घोषणा आंगणे कुटुंबीयांनी केलेली असून, तारीख जाहीर होताच भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. वर्षातून एकदाच होणारी ही यात्रा म्हणजे कोकणातील भक्ती, परंपरा आणि श्रद्धेचा अनोखा संगम मानला जातो. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे तिची तारीख प्रत्येक वर्षी ठराविक नसते. गावातील मानकरी, धार्मिक परंपरा आणि देवीचा कौल या तिन्ही प्रक्रियांवर आधारित हा निर्णय घेतला जातो.

यावेळीही मानकऱ्यांनी धार्मिक विधी पार पाडल्यानंतर मंदिरात पंचांग ठेवून देवीला कौल विचारला. कौल लागताच आंगणे कुटुंबीयांनी 9 फेब्रुवारी 2026 ही तारीख जाहीर केली. दरवर्षी तारीख जाहीर होईपर्यंत निर्माण होणारा आनंद यंदाही तसाच अनुभवायला मिळाला. श्री देवी भराडी आई हे कोकणातील लाखो भाविकांचे अत्यंत श्रद्धास्थान आहे. ‘नवसाला पावणारी देवी’ म्हणून ख्याती असलेल्या या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते. मंदिर हे आंगणे कुटुंबीयांचे खाजगी असले तरी दर्शनासाठी ते सर्वांसाठी खुले आहे. राजकीय नेत्यांसाह सर्वच जण या दिवशी देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे असतात. एकाच दिवसात हजारोंपासून लाखो भाविक एकत्र येत असल्याने आंगणेवाडी यानिमित्ताने भाविकांनी गजबजून जाते.

हेही वाचा: Heron MK2 Drone: भारताचा मोठा संरक्षण करार; इस्रायलचे Heron MK 2 ड्रोन आता नौदलात दाखल

या दरवर्षीच्या यात्रेला येणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान असते. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बसगाड्या तर कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या चालवल्या जातात. वाहतूक नियंत्रित ठेवण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलीस यंत्रणा कायमच सज्ज असते. मंदिर परिसरात वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तात्पुरते शेड्स आणि नियंत्रण व्यवस्था उभारण्यासाठी महिनाभर आधीपासून मोठी तयारी सुरू होते.

आंगणे कुटुंबीयांसह ग्रामस्थ मंडळ यात्रेसाठी विशेष नियोजन करत असून, भाविकांना निर्विघ्न दर्शनाचा अनुभव मिळावा यासाठी सर्वजण सक्रियपणे सहभाग घेतात. देवीच्या कृपेची अनुभूती घेण्यासाठी हजारो कुटुंबे वर्षातून एकदाच या दिवशी भेट निश्चित करतात. त्यामुळे गावातील वातावरण यात्रेच्या तयारीने भरून जाते. तारीख जाहीर होताच कोकणभरात तसेच महाराष्ट्रातील अनेक भागांत भाविकांनी आपापली तयारी सुरू केली आहे. निवास, प्रवास, नवस, पूजा यांसाठी नियोजन वेगाने सुरू झाले असून, यंदाची यात्रा अधिक भव्य आणि उत्साहपूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत. 9 फेब्रुवारी 2026 रोजी आंगणेवाडी पुन्हा एकदा भक्तीच्या समुद्राने भरून जाणार आहे.

हेही वाचा: Local Body Elections in Maharashtra: नाशिक निवडणुक 'लक्ष्मी दर्शनाने' गाजली; पैशांची बेसुमार उधळपट्टी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number