Sun Transit In Bharani Nakshatra: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव 12 राशींच्या व्यक्तींवर वेगवेगळा होताना पाहायला मिळतो. तर, या शास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो.
पंचागानुसार, सूर्य सध्या मेष राशीत आणि अश्विनी नक्षत्रामध्ये विराजमान असून 27 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी सूर्य भरणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. 11 मे पर्यंत याच नक्षत्रामध्ये राहणार आहे. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे 12 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.
हेही वाचा - Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घराच्या 'या' दिशेला धान्य ठेवावे, काहीही कमी पडणार नाही..!
कुंभ राशी
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन काहीतरी करण्याची इच्छा होत राहील. योग्य मार्ग सापडला तर तुम्ही त्यावर नक्की मेहनत घ्यावी.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचे भरणी नक्षत्रातील प्रवेश अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच, बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. या ठिकाणी पूर्ण मनापासून शिकण्यास आणि काम करण्यास प्राधान्य दिल्यास पुढे आणखी अनेक वाटा खुल्या होतील.
कर्क राशी
कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल. कर्क राशीच्या दहाव्या घरात सूर्य विराजमान होणार आहे. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. आसापासच्या लोकांची साथ मिळेल.
हेही वाचा - या राशीच्या लोकांनी जरूर घालावी सोन्याची अंगठी! नशीब साथ देऊ लागेल..
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही. )