Friday, April 25, 2025 09:24:27 PM

शीतला अष्टमीला करा 'या' गोष्टींचे दान, आर्थिक संकट होईल दूर

मान्यतेनुसार, शीतला अष्टमीला दान केल्यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया शीतला अष्टमीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे?

शीतला अष्टमीला करा या गोष्टींचे दान आर्थिक संकट होईल दूर

हिंदू धर्मात शीतला अष्टमीला विशेष महत्व आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार, शीतला अष्टमी दरवर्षी चैत्र महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला असते. त्यानुसार, 22 मार्च 2025 रोजी शीतला अष्टमी आहे. यादिवशी, उपवास करून शीतला देवीची विधिपूर्वक पूजा केली जाते. परिवाराच्या सुख-शांती आणि समृद्धीसाठी शीतला अष्टमीला अनेक भाविक उपवास करतात. शीतला अष्टमीला काही गोष्टींचे दान केले जाते. मान्यतेनुसार, शीतला अष्टमीला दान केल्यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया शीतला अष्टमीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे? 


'या' दिवशी असते शीतला अष्टमी:

वैदिक दिनदर्शिकेनुसार, शीतला अष्टमी दरवर्षी चैत्र महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला असते. त्यानुसार, यावर्षी शीतला अष्टमी 22 मार्च 2025 रोजी पहाटे 04:23 वाजता सुरू होईल. त्यानंतर, शीतला अष्टमी 23 मार्च 2025 रोजी पहाटे 05:23 वाजता संपेल.

 

हेही वाचा: Numerology: या मूलांकांसाठी सोमवार ठरणार लकी! चांगली बातमी मिळेल; पण काही बाबतीत संयम महत्त्वाचा

 


शीतला अष्टमीला करा 'या' गोष्टींचे दान:


शीतला अष्टमी 22 मार्च 2025 रोजी आहे. शीतला अष्टमीला दान करण्याचे विशेष महत्व आहे. मान्यतेनुसार, या दिवशी, काही गोष्टींचे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होते आणि घरात सुख-समृद्धी येते. चला तर जाणून घेऊया शीतला अष्टमीला कोणत्या गोष्टींचे दान करावे:

 

1 -  कपडे:

शीतला अष्टमीला वस्त्र दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला कपडे दान करू शकता. ज्यामुळे, शीतला देवी तुम्हाला आशीर्वाद देईल. त्यासोबत, तुमच्या घरामध्ये पैशांची कमतरता भासणार नाही.

 

2 - धान्य:

शीतला अष्टमीच्या दिवशी धान्य दान करणे देखील चांगले मानले जाते. या शुभ तिथीला जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला धान्य दान केल्यामुळे, तुमच्या घरात अन्नाची कमतरता कधीच जाणवणार नाही. 

 

3 - झाडू:

शीतला अष्टमीला झाडू दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी, तुम्ही कोणत्याही मंदिरात किंवा गरजू ठिकाणी झाडू दान केल्यामुळे, तुमच्या घरात सतत सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो आणि त्यासोबतच, घरात समृद्धी येते.

 

4 -  सुपली:

शीतला अष्टमीच्या दिवशी सुपली दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शीतला अष्टमीच्या दिवशी सुपली गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान केल्याने, शीतला देवी तुम्हाला आशीर्वाद देईल. त्यासोबतच, तुमच्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री